
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत नांदगाव मधील श्रीमती.निकिता दिनेश मोरे यांची महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे. त्या बहिरोबावाडी येथील सौ. नंदा व श्री.विठ्ठल तोरडमल यांच्या कन्या असून राज्यकर निरीक्षक दिनेश मोरे यांच्या पत्नी आहेत. निवडीनिमित्त त्यांचा सत्कार नांदगांव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी श्री. भाऊसाहेब गुंड ( उपसरपंच ), घनश्याम नेटके (माजी सरपंच), अमोल निंबाळकर(ग्रामपंचायत सदस्य), अण्णा बागल( ग्रामपंचायत सदस्य), किसन मोरे, माणिक बागल , रवींद्र दरेकर, गणेश बागल,अक्षय खराडे, कोमल तनपुरे, सविता घालमे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.







