
प्रभूश्रीरामचंद्र व श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी श्री . किसन भगवान कोपनर यांनी दोन लाख रूपये व हमाल पंचायत , पुणेचे उपाध्यक्ष तथा डोंबाळवाडीचे उद्योजक श्री. दत्ता भाऊ डोंबाळे यांनी एक लाख देणगी काल लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब कोपनर , मा.सरपंच नानासाहेब खामगळ, मा.सरपंच बापूसाहेब खामगळ, पत्रकार सुनील खामगळ, पांडुरंग डोंबाळे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सुपूर्द केली .
श्री.संत लिंबाजी महाराज मंदिर परिसरात प्रभू श्रीरामचंद्र मंदिर व श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुरू करण्याचे काम सुरू होणार आहे. या कामी किसन भगवान कोपनर यांनी दोन लाख रुपये व हमाल पंचायतचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ डोंबाळे यांनी श्री.संत लिंबाजी महाराज मंदिर परिसर जीर्णोद्धार करण्यासाठी एक लाख रुपयांची देणगी देण्याचे अगोदर कबूल केले होते. काल त्यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत देणगी सुपूर्द केली. यावेळी ग्रामस्थांतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला .







