
मामाच्या गावात धालवडी (ता. कर्जत) झालेल्या गौरवाने भाचा भावूक झाला. अन्न सुरक्षा अधिकारी झालेले संकेत सूर्यवंशी यांनी मिळविलेल्या यशाबद्दल , ग्रामस्थांनी हलगी ताशांच्या गजराने तसेच परिसरातील लेझीम पथकाने मिरवणूक काढून त्यांचा गौरव केला .
पांडुरंग चंद्रभान खोडवे व भाऊसाहेब चंद्रभान खोडवे यांची बहीण अलका यांना चांदे ,(ता. कर्जत) या गावात दिलेले आहे. शेतकरी कुटुंबातील वडील अनिल गणपत सूर्यवंशी व आई अलका अनिल सूर्यवंशी यांचा मुलगा संकेत यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चांदे बुद्रुक या ठिकाणी झाले. पुढील शिक्षण घेऊन संकेतने, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्याचा निकाल नुकताचं जाहीर झाला. यामध्ये तो अन्नसुरक्षा अधिकारी या परीक्षेत उत्तीर्ण झाला .याचा आनंद संपूर्ण गावाला झाला. त्याचा संपूर्ण गावाने तसेच हितचिंतकांनी एकत्र येऊन धालवडी या मामाच्या गावात व्यासपीठावर गौरव केला. यामुळे गावचा भाचा असलेला संकेत सूर्यवंशी भारावून गेला . त्याचबरोबर संकेतचे मेव्हणे नितीन नानासाहेब पवार यांचीही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संकेतचे मामा पांडुरंग चंद्रभान खोडवे ,भाऊसाहेब चंद्रभान खोडवे, बाळासाहेब महादेव खोडवे, महेंद्र सुखदेव खोडवे, रवींद्र उद्धव खोडवे ,दत्तात्रय रूपचंद खोडवे यांनी केले तसेच स्नेहा खोडवे, ऋतुजा खोडवे, सुष्मिता पवार याही नियोजनात सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमाला उपस्थित सर्वांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता .
यावेळी माजी जि. प. सदस्य शांतीलाल कोपनर ,कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र गुंड,ॲड. अशोकराव गुंड , चांदे बुद्रुकच्या सरपंच पूजा सूर्यवंशी , माजी सरपंच अरुण लामटुळे , बापूसाहेब वाळुंज आदींनी मनोगते व्यक्त करत शुभेच्छा दिल्या .
यावेळी धालवडी व पंचक्रोशीतील पाहुणे ,मामांची मित्र मंडळी ग्रामस्थ तसेच महिलाही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय खराडे यांनी केले तर सर्वांचे आभार दत्तात्रय खोडवे यांनी मानले .
प्रतिक्रिया
अभ्यासात सातत्य ठेवल्यास यशाला गवसणी घालणेअतिशय सोपे जाईल .संकेतचा आदर्श समोर ठेवून नवीन पिढीतील युवकांनी अधिकारी होऊन आम्हाला सत्कार करण्याची संधी द्यावी”
राजेंद्र गुंड , माजी उपसभापती पंचायत समिती कर्जत
प्रतिक्रिया
,”कठोर परिश्रम करण्याची जिद्द, चिकाटी असेल तर यश निश्चितचं मिळेल. जर या वयात वर्ष दोन वर्ष मेहनत केली तर पुढील चाळीस वर्षे सुखी जीवन जगाल”
– पूजा सूर्यवंशी सरपंच चांदे बु., ता. कर्जत







