रोहिणी तात्यासाहेब खेडकर यांची जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल रवळगाव ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार 

Google search engine

 

रोहिणी तात्यासाहेब खेडकर यांचे जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल रवळगाव ग्रामस्थांमार्फत त्यांचा आज सत्कार करण्यात आला.

भारतीय जनता पार्टीचे बुथ प्रमुख अशोक जाधव यांनी या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते .

जिल्हा नियोजन समितीची जिल्ह्याच्या विकासाच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे . पंचायतीने केलेल्या आराखड्यानुसार तालुका आणि जिल्ह्याचा समग्र आराखडा तयार करता येतो . पंचायतीच्या कारभाऱ्याने गावाची नेमकी गरज आणि त्याच्याशी सलग्न योजना यांची सांगड घालून आपल्या विभागातील जिल्हा नियोजन समिती सदस्याला अवगत केल्यास लाभ मिळतो.

यावेळी सत्कारास उपस्थित बाजीराव नाना खेडकर , मनोहर तात्या रासकर , अशोक कांबळे , गोवर्धन खेडकर , कैलास कांबळे , बाबुराव खेडकर राजेंद्र रासकर टेलर किरण वायाळ भीमराव वायाळ , सचिन वायाळ अविनाश खेडकर , सलीम पठाण दादासाहेब खेडकर , दुकानदार अशोक तिखे , लक्ष्मण गोरे , रमेश शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

यावेळी सर्व ग्रामस्थांनी विधानपरिषदेचे सभापती प्रा .राम शिंदे साहेब यांनी रवळगावला हा मोठा बहुमान दिल्याने यावेळी सर्व ग्रामस्थांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे साहेब यांचे आभार मानले.