श्री. नागेश्वर विद्यालय , थेरगाव येथे अद्ययावत संगणक कक्षाचे उद्घाटन

0
331
Google search engine

 

पुण्यातील वनराई संस्था आणि समाजसेविका डॉ. वैशाली नाईक यांच्या आजी तुळसाबाई सातारकर यांच्या स्मरणार्थ संगणक कक्ष उद्घाटन व हस्तांतरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

प्रमुख पाहुणे म्हणून अमित वाडेकर साहेब , व राकेश शेलार , प्रकल्प समन्वयक , वनराई संस्था पुणे व सौरभ शहा , संगणक विभाग व अक्षय पाटील , पांडू चव्हाण ,मानव विकास व संवर्धन सेवा मंडळाचे सचिव प्रा .विश्वनाथ जोगदंड , थेरगाव चे सरपंच अनिल शिंदे साहेब , उपसरपंच रामा शिंदे , रमेश शिंदे, शरद गांगर्डे, आदी उपस्थित होते.या सर्वांच्या उपस्थितीत नागेश्वर विद्यालयाला २० संगणक संच व इतर साहित्य भेट देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.के.दाते सर यांनी केले.यावेळी बोलताना ते म्हणाले , २१ व्या शतकात विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान आवश्यक असून संगणकाबद्दल विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी म्हणून अमेरिका स्थित डॉ .वैशाली नाईक यांनी स्वतःच्या आजींच्या स्मरणार्थ संगणक दिल्याबद्दल मुख्याध्यापक दाते सर यांनी त्यांचे आभार मानले.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अमित वाडेकर साहेब म्हणाले , संगणक साक्षरता ही काळाची गरज आहे. विद्यार्थी संगणक साक्षर बनवा व पुढील भविष्यात या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा यासाठी आतापासून मुलांना संगणकाची आवड निर्माण व्हावी म्हणून शिक्षकांनी प्रयत्न करावेत.

यावेळी बोलताना थेरगावचे सरपंच अनिल शिंदे साहेब यांनी  मनोगत व्यक्त करताना मी या विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे व शाळा प्रगतीपथावर आहे असे मनोगत व्यक्त केले.प्रा विश्वनाथ जोगदंड यांनी वनराई संस्था व डॉ. वैशाली नाईक यांचे आभार मानले.