श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती उत्साहात साजरी

0
142
Google search engine

 

 

श्री संत संताजी जगनाडे महाराज यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केले. त्यांच्या कार्यातून समाजात प्रबोधन होऊन समाज जागृत झाला. त्यांचे विचार आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन शहराध्यक्ष नवनाथ दळवी यांनी केले.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य संत संताजी जगनाडे महाराजांनी केले. तिळवण तेली समाज संघटना राशीनच्या वतीने राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या

प्रतिमेचे पूजन अंबादास दळवी यांच्या हस्ते महाआरती करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांना पेढ्याचे वाटप करण्यात आले. यावेळी श्रीकांत देशमाने,संतोष वाकचौरे , रमेश भोज , महेश भोज , सोमनाथ दळवी , कुमार अक्षय गायकवाड , पप्पू राऊत  विठ्ठल गायकवाड, पप्पू भोज, सुरज देशमाने, भाऊसाहेब राऊत, राजेंद्र अनगरकर, सुरेश कानगुडे, कुमार गायकवाड, समर्थ भोज, भैय्या नागमल , पिंटू राऊत आदी उपस्थित होते.