विज्ञान , गणित प्रदर्शनासाठी कर्जत तालुका सज्ज १८ ते २० डिसेंबर २०२४ दरम्यान कोटा मेंटॉर्स विद्यालयात प्रदर्शनाचे आयोजन 

Google search engine

 

 

तालुकास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन १८ ते २० डिसेंबर २०२४ या कालावधीत होणार असून प्रदर्शनाच्या नियोजनाबाबतची सहविचार सभा पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी उज्ज्वला गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कोटा मेंटॉर्स विद्यालय , कर्जत येथे पार पडली.

बैठकीत पुढील वर्षी होणारे विज्ञान प्रदर्शन तालुक्यातील जगदंबा विद्यालय , राशीन येथे घेण्यात येणार असल्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.

 

५२ वे विज्ञान प्रदर्शन उत्कृष्ट पार पाडण्यासाठी विज्ञान शिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक, शिक्षक व इतर सर्व शिक्षक मंडळींनी कंबर कसली आहे. येत्या १८, १९ व २० डिसेंबर रोजी विज्ञान प्रदर्शन कोटा मेंटॉर्स विद्यालयात अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांच्या एकजुटीने आणि सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडू , असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला .

कोटा मेंटॉर्स विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष केशव आजबे, विज्ञान संघटनेचे

अध्यक्ष संजय तापकीर, सचिव विठ्ठल हजारे, गणित संघटनेचे अध्यक्ष बाजीराव जाधव, उपाध्यक्ष रवींद्र पांडुळे, कर्जत तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र माने, सचिव संदीप काळे, जिल्हा प्रतिनिधी भागवत गायकवाड, गजेंद्र जगताप, बापूसाहेब मुरकुटे, गोरख शिंदे, सुभाष सुपेकर, दीपक वाघमारे, पांडुरंग धनवडे, कुंडलिक शिंदे, दत्तात्रय टकले, सुनील खेतमाळस, नीलेश आजबे, शाळेचे मुख्याध्यापक, ज्योती अवसरे, बाळकृष्ण मांडगे, नंदलाल काळदाते, रामचंद्र राजापुरे, अनिल टकले, विठ्ठल सुद्रिक, प्रल्हाद निकत, राजेंद्र थोरात, विजय तोरडमल आदी विज्ञान-गणित संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. संजय तापकीर यांनी प्रास्ताविक केले. पांडुरंग धनवडे यांनी आभार मानले.