बहुचर्चित आजबे खून प्रकरणातील आरोपीचा जामीन दुसऱ्यांदा फेटाळला

0
1307
Google search engine

 

 

मौजे शिराळ तालुका आष्टी येथील व कोटा मेंटॉर्स शाळेवर नोकरीस असलेले मयत अशोक आजबे यांचा दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी चिंचोली फाटा येथे झालेल्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या पत्नी मनीषा आजबे हिचा जामीन श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायालयाने १७/१०/२०२४ रोजी पहिल्यांदा नामंजूर केला होता. मयत अशोक आजबे हे आपले मामा रामचंद्र उर्फ बाळू खोटे यांचे घरी लहानाचे मोठे झाल्याने व रातंजन गावाशी लहानपणापासून नाळ जोडली गेली असल्याने काल्याचे कीर्तनाची पंगत देऊन आपल्या घरी गेले होते नंतर संध्याकाळी कर्जत येथे जात असताना चिंचोली फाट्याजवळ त्यांना आरोपी योगेश आजबे याने डोक्यात मारहाण करुन जखमी केले होते त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. सदर घटनेबाबत १३ ऑगस्ट २०२४ रोजी मिरजगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता सदर घटनेबाबत पुरावा मिळून आल्याने पोलिसांनी पत्नी मनिषा आजबे हिस अटक केले होते व सदर आरोपीस न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर आरोपीने जामीनासाठी अर्ज केला होता सदर जामीन अर्जामध्ये मूळ फिर्यादी यांचे वतीने ॲड. राहुल मते यांनी आरोपीचा गुन्ह्यात असणारा सहभाग लक्षात आणून देता मे कोर्टाने आरोपीचा पाहिला जामीन अर्ज १७/१०/२०२४ रोजी नामंजूर केला होता. त्यानंतर गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी चार्जशीट दाखल केले होते दोषारोपपत्र दाखल होताच मयताची पत्नी आरोपी मनीषा आजबे हिने लागलीच पुन्हा एकदा श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायालयात १४/११/२०२४ रोजी दुसऱ्यांदा जामीनासाठी अर्ज केला होता सदर जामीन अर्जाची माहिती फिर्यादीस होताचा त्यांनी ॲड राहुल मते यांच्याशी चर्चा केली व त्यानंतर राहुल मते यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात आणून देता तिचा जामीन फेटाळणे गरजेचे असल्याचे मे कोर्टाचे लक्षात आणून दिले. सदर जामीन अर्जावरती जिल्हा न्यायाधीश मा शिंगाडे साहेब यांनी दिनांक ०५/१२/२०२४ रोजी निर्णय दिला व सदर आरोपीचा जामीन दुसऱ्यांदा नामंजूर केला आहे .