
डॉ.राम अनभूले यांना LAVA-MH चा यंग इंस्पायरींग पशुवैद्यक पुरस्कार प्रदान शिर्डी येथे नुकताच प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यातील मोठ्या जनावरा तील पशुवैद्यकांची संघटना (LAVA-MH) यांनी शिर्डी येथे दिनांक १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित एक दिवसीय तांत्रिक परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली. परिषदेचे उद्घाटन डॉ.अनिल भिकाणे, संचालक विस्तार शिक्षण, माफसू, नागपूर डॉ.भरत काकडे अध्यक्ष, बायफ, पुणे, डॉ. प्रशांत धर्माधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नाशिक, डॉ. मुळेकर अध्यक्ष, पशुवैद्यक वेलफेअर असोसिएशन आणि डॉ. विकास चत्तर,अध्यक्ष, LAVA-MH (LARGE ANIMAL VETERINARIANS ASSOCIATION MAHARASHTRA) यांच्या हस्ते झाले.
परिषदेमध्ये डॉ.शिवरामन, प्राध्यापक, पशुवैद्यकिय औषधी शास्त्र विभाग, सालेम, तमिळनाडू यांनी गाईतील खाली बसण्याचे आजार याबद्दल माहिती दिली, डॉ. विकास चत्तर यांनी जनवारांतील योग्य रोग निदानाने होवू शकणारे उपचार व परिणाम डॉ. मनोज शिंदे यांनी उपस्थितांना जनावरांतील होमिओपॅथीक उपचार पद्धती, डॉ. चेतन वंजारी यांनी जंगली जनावरांतील विविध आजार व उपचारांची माहिती उपस्थितांना दिली. परिषदेकडून डॉ. व्यंकटराव घोरपडे यांना जीवन गौरव पुरस्कार, डॉ. सॅम लुद्रीक यांना उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार, डॉ. चैत्राली आव्हाड व डॉ. राम अनभुले यांना तरुण प्रेरणादायी पशुवैद्यक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
परिषदेला राज्यातून २५० पशुवैद्यक उपस्थित होते. परिषद यशस्वी होण्यासाठी डॉ.विकास चत्तर, डॉ. मनोज शिंदे, डॉ. विकास सातपुते. डॉ. सचिन वंजारी. डॉ. गणेश निटुरे, डॉ. विजय झांबरे डॉ. विष्णु झांबरे, डॉ. चारुदत्त आसलकर, डॉ. तानाजी भोसले, डॉ.दिनेश पांडुरे , डॉ.अमोल गायकवाड आणि तेजस घुले सर्व LAVA-MH मेंबर यांचे व श्री नाना वाणी यांचे सहकार्य लाभले. यावेळी या तांत्रिक परिषदेसाठी प्रायोजक असलेल्या १० पशुवैद्यकीय कंपन्याचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.







