
विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपली असून आता संपूर्ण राज्यामध्ये आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कर्जत तालुक्याचे युवा सेनेचे तालुकाप्रमुख व तडफदार नेतृत्व असणारे सोमनाथ शिंदे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा धर्म पाळताना लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील व विधानसभेचे उमेदवार प्राध्यापक राम शिंदे यांचे प्रत्येक गाव वाडी वस्तीवर जाऊन काम केले आहे. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मोठा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला आहे. यामुळे आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये चापडगाव जिल्हा परिषद गटामधून महायुतीचे उमेदवार सोमनाथ शिंदे हेच आता प्रबळ दावेदार यामुळे झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून किंबहुना त्याही पक्ष पुढे जाऊन त्यांनी युवा सेनेच्या माध्यमातून मतदार संघातील सर्व ३५३ बुथवर काम केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला संधी द्यावी अशी अपेक्षा सर्व शिवसैनिकांची आहे.सामाजिक कार्याचा वारसा सोमनाथ शिंदे हे युवा सेनेचे पदाधिकारी असले तरी देखील खऱ्या अर्थाने चापडगाव जिल्हा परिषद गटामध्ये व कर्जत तालुक्यात सामाजिक कार्यामध्ये सातत्याने अग्रेसर असतात. त्यांच्या माध्यमातून आरोग्य सेवेचे मोठे काम झाले आहे. अनेक गरीब कुटुंबीयांना त्यांनी रुग्णालयामधून मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून लाभ मिळून दिला आहे. राज्यातील सर्व वीर माता आणि वीर पत्नींचा सन्मान त्यांनी चापडगाव येथे केला आहे. त्याचप्रमाणे चापडगाव परिसरातील शेतकऱ्यांचा शेतीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी कोकाटे तलाव याची मागणी त्यांनी प्रामुख्याने लावून धरली आणि याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे याच प्रमाणे चापडगाव येथे दिवंगत मंत्री व राज्याचे नेते आबासाहेब निंबाळकर यांचे कार्य आजच्या पिढीला मार्गदर्शक ठरावी यासाठी त्यांचे स्मारक व कमान उभा केली जावी यासाठी देखील त्यांनी पाठपुरावा केला आहे. सातत्याने शिक्षण आरोग्य पाणी या प्रश्नावर त्यांनी आपल्या सर्व मित्र पक्षाच्या सहकाऱना सोबत घेत काम केले आहे.
मित्र पक्षामध्ये स्नेहाचे संबंध सोमनाथ शिंदे हे युवा सेनेचे पदाधिकारी असले तरी मित्र पक्ष असणारा भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या दोन्ही पक्षातील कर्जत व जामखेड तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी नेते व कार्यकर्ते यांचे त्यांनी अतिशय स्नेहाचे संबंध जपले आहेत. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये तसेच राजकीय वाटचालीमध्ये सातत्याने त्यांनी पुढाकार घेऊन मदत केली आहे. यामुळे त्याचा फायदा त्यांना नक्कीच जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये होणार आहे. दिवंगत केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मतदारसंघांमध्ये अनेक गोरगरीब नागरिकांचे कामे केले आहेत. आजही गांधी कुटुंबीयांशी त्यांचे तितकेच स्नेहाचे संबंध आहे. या सर्व राजकीय व सामाजिक कार्यामुळे सोमनाथ शिंदे यांचा चापडगाव जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारीचा दावा भक्कम होतो. त्यांच्या उमेदवारीला मित्रपक्ष असणाऱ्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांचाही पाठिंबा निश्चित मिळेल.







