महात्मा गांधी विद्यालय, कर्जत येथील श्री. रवींद्र गांगर्डे सर यांची शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी निवड

Google search engine

 

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.शरदचंद्र पवार साहेबांच्या देदीप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी सुरु करण्यात आलेली शरद पवार इन्स्पायर फेलोशिप महात्मा गांधी विद्यालय, कर्जत येथील शिक्षक श्री रवींद्र सोपान गांगर्डे सर यांना प्राप्त झाली आहे.

२०२१ पासून सुरु करण्यात आलेल्या या फेलोशिपमध्ये विविध क्षेत्रांतील गुणवंतांना प्रोत्साहन देण्यात येते. शिक्षण क्षेत्रासाठी निवडलेल्या फेलोंना भविष्यकाळातील नेतृत्व विकसित करण्यासाठी या फेलोशिपद्वारे प्रेरीत केले जाते. यंदा, किमान १५० संशोधन प्रकल्पांमधून श्री.रवींद्र सोपान गांगर्डे सर यांची निवड करण्यात आली आहे.

श्री. रविंद्र गांगर्डे सर यांनी शालेय हवामान केंद्र, हवेची गुणवत्ता विश्लेषण आणि विद्यार्थी कौशल्य विकास या विषयावर संशोधन प्रकल्प सादर केला आहे. त्यांच्या प्रकल्पाची मांडणी पुणे, बारामती, मुंबई येथे माननीय खासदार शरदचंद्र पवार साहेब आणि खासदार सुप्रिया सुळे ताई यांच्या समोर सादर करण्याची संधी मिळणार आहे.    या यशस्वी प्रवासात उत्तर विभाग अहमदनगरच्या विभागीय अधिकारी श्री. नवनाथ बोडखे सहाय्यक विभागीय अधिकारी श्री. नायकवाडी साहेब आणि श्री. तोरणे साहेब, श्री. काकासाहेब वाळुंजकर साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महात्मा गांधी विद्यालय, कर्जतचे प्राचार्य श्री.राजकुमार चौरे सर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या सुश्री मीनाताई जगधने तसेच जनरल बॉडी सदस्य मा. राजेंद्रजी फाळके तात्या यांनीही त्यांचे कौतुक केले आहे.  या फेलोशिपद्वारे रवींद्र गांगर्डे सर हे आपल्या विद्यालयात हवामान केंद्र आणि विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासाचे कार्य राबवणार आहेत. त्यांच्या या महत्त्वपूर्ण यशामुळे रयत शिक्षण संस्थेच्या गुणवत्तेचा नवा ठसा उमटला आहे.