
मा. शरदचंद्रजी पवार सभागृह पुणे , जिल्हा परिषद पुणे येथे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२४ प्रदान सोहळा उत्साहात काल संपन्न झाला . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. व्हिक्टोरिया मुत्तुम , जनरल डायरेक्टर पेस एज्युकेशन डिपार्टमेंट ग्लोबल ०५ इंडिया ब्रँच यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यामध्ये प्रमुख पाहुणे मा. महेश पालकर , शिक्षण संचालक नियोजन महाराष्ट्र राज्य , तसेच मा. श्री. डॉ. मिलिंद हिरवे , विभाग प्रमुख वाणिज्य व्यवस्थापक मध्य रेल्वे पुणे , व मा. डॉ .श्रीराम पानझाडे , शिक्षण सहसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग महाराष्ट्र राज्य पुणे ,तसेच मा. श्री. विशाल लोंढे ,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे , व मा. पी.एस.काळे , शिक्षण प्रसार अधिकारी पुणे मनपा , व मा. वैभव गीते , राज्यसचिव नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडला. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आला. यामध्ये श्री.शिंदे गोरख भाऊसाहेब यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२४ देण्यात आला.यावेळी सत्कार स्विकारताना गोरख शिंदे सर , श्री नागेश्वर विद्यालय थेरगाव , विश्वनाथ जोंगदड सर , संस्थापक अध्यक्ष श्री नागेश्वर विद्यालय थेरगाव , सौ. जोंगदड मॅडम, अजित निमसे सर , अनिल शिंदे सर , किरण शिंदे , नवनाथ सुळके, व किशोर शिंदे व मित्रपरीवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल गोरख भाऊसाहेब शिंदे सर यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे .







