राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता प्रांजली थेटेची निवड

Google search engine

 

कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील प्रांजली नितीन थेटे हिची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता नुकतीच निवड झाली .
राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा नुकत्याच अकोले येथे पार पडल्या. या स्पर्धेत पुणे विभाग (अहिल्यानगर) संघ विजेता ठरला. या संघातील खेळाडू प्रांजली नितीन थेटे हिची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला प्रशिक्षक राजू कदम सर , पुणे वडगाव शेरी यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडू प्रांजली थेटे ही डिकसळ येथील प्रगतशील शेतकरी मुरलीधर थेटे पाटील यांची नात आहे. तिच्या या यशाबद्दल डिकसळ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.