
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ सध्या हायटेक मतदारसंघ असून या निवडणुकीत भूमिपुत्र म्हणून आमदार प्रा.राम शिंदे यांच्या विजयासाठी युवक वेगवेगळे नवस करताना पहायला मिळत आहे. आ . प्रा.राम शिंदे यांच्या विजयासाठी कुळधरण येथील मारूती भवाळ , किसान मोर्चा भाजपा चिटणीस यांनी तुळजापूर येथे देवीला महापूजा व आ.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या वजनाइतके पेढे वाटप करणार असून व तसेच कुळधरण येतील जगदंबा देवीला १०१ किलोंच्या फुलांची आरास शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत अर्पण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यकर्त्याला नेहमी प्रेरणा देणारे नेता म्हणून आमदार प्रा .राम शिंदे यांची ओळख ते सर्वसामान्यांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी असतात. त्यांच्या विजयासाठी मतदार संघातील सर्व भूमिपुत्र व नेते एकवटले आहेत. या निवडणुकीत जनतेचा कौल आ.राम शिंदे यांच्या बाजूने झुकत आहे. आमदार राम शिंदे यांच्या विजयासाठी मारूती भवाळ यांनी महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आई तुळजाभवानी व आई जगदंबा देवीला साकडे घातले असून जनतेच्या मतदान रुपी आशीर्वादाने आमदार शिंदे यांनी विधानसभेत मोठा विजय संपादन करून नामदार व्हावेत. त्यासाठी त्यांनी देवीला साकडे घातले असून आई तुळजाभवानी व जगदंबा देवी चरणी बोललेला नवस कधी वाया जात नाही. देवीला घातलेले माझे साकडे नक्की पूर्ण होईल आणि आमदार प्रा .राम शिंदे मोठ्या मताधिक्याने विजय होतील असा विश्वास मारूती भवाळ यांनी व्यक्त केला आहे .







