आ.प्रा.राम शिंदे साहेब यांना कापरेवाडी , शिंदेवाडीतून मोठे लीड देणार : लोकनियुक्त सरपंच अशोक खराडे 

Google search engine

 

माजी मंत्री भूमिपुत्र प्रा. आ.राम शिंदे साहेब हे विकासाचे जनक असून कापरेवाडी , शिंदेवाडीतून मोठे लीड देणार असल्याचा निर्धार लोकनियुक्त सरपंच अनिल खराडे यांनी व्यक्त केला.यावेळी बोलताना ते म्हणाले, माजी मंत्री प्रा . राम शिंदे यांच्या रूपाने मतदार संघात कोट्यवधींचा निधी आणून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली.यावेळी बोलताना ते म्हणाले , महायुती सरकारने माझी लाडकी बहिण योजना आणली. कापरेवाडी शिंदेवाडी मध्ये २ वर्षात मोठी विकासकामे मंजुर झाली आहेत. यामध्ये १० कोटींचे कामे आहेत. कापरेवाडी शिंदेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत खुप विकास कामे होणे गरजेचे होते ही बाब लक्षात घेवून अनिल खराडे , सरपंच झाल्यानंतर कापरेवाडी विकास कामासाठी आमदार प्रा.रामजी शिंदे साहेब व पै.प्रवीण दादा घुले पाटील यांच्याकडे पाठपुरावा करुन गेल्या २ वर्षात मंजूर केली आहे. ही कामे लवकरच सुरु होणार आहेत. याध्ये कापरेवाडी शिंदेवाडी रस्ता ३० लक्ष , कर्जत शिंदेवाडी रस्ता ३.५ कोटी , बाजरखीला कापरेवाडी जिल्हा परिषद शाळा मुळे गल्ली रस्ता १.२५ कोटी , पानंद रस्ते २ कोटी ,पेव्हर ब्लॉक ५० लक्ष काँक्रीट रस्ते ५० लक्ष , जिल्हा परिषद शाळा , अंगणवाडी सुधारणा कारणे ३० लक्ष , गावठाण पाणीपुरवठा विहीरीसाठी स्वतंत्र डिपी करणे ५ लक्ष ,गाव व शेतीसाठी वीजवितरण देखभाल दुरुस्ती करणे ५ लक्ष तसेच रोजगार हमी योजनेतून गेल्या २ वर्षात अंदाजे २.५ कोटींचे कामे मंजुर होऊन सुरु झाले आहेत. आपल्या गावाच्या विकासाला कायम साहेबांनी व प्रवीणदादांनी प्राधान्याने दिले आहेत. यापुढेही राहिलेले कामे होण्यासाठी भरीव निधी आ . प्रा.रामजी शिंदेसाहेब देणार आहेत. आपण येणाऱ्या निवडणुकीत गाव विकासासाठी साथ देण्यासाठी श्री. राम शंकर शिंदे यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

जलयुक्त शिवार सारख्या योजनेच्या माध्यमातून त्यांनी आ.प्रा.राम शिंदे साहेबांना भरघोस मतदान देवून त्यांचे हात बळकट करणार आहोत. अहिल्यानगर सोलापूर रस्ता , भिगवन अमरापुर रस्त्यामुळे दळणवळण सुलभ झाले. आ. प्रा.राम शिंदे साहेब हेच खरे विकास पुत्र आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली .