माजी मंत्री भूमिपुत्र प्रा. आ.राम शिंदे साहेब हे विकासाचे जनक असून कौडाणेतून मोठे लीड देणार असल्याचा निर्धार सरपंच यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, माजी मंत्री प्रा . राम शिंदे यांच्या रूपाने मतदार संघात कोट्यवधींचा निधी आणून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली.यावेळी बोलताना ते म्हणाले , पै.प्रवीण सुद्रीक , मा.सरपंच यांच्या नेतृत्वाखाली व माजी सरपंच धनराज सुद्रीक यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली आ.राम शिंदे साहेबांना मोठे लीड देणार असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते अपप्रचार करत आहेत, दमबाजी करत
.
सुटले आहेत. स्वता:च्या भाषणापुरते आणि स्वता:चं नेतृत्व पुढं करण्यासाठीच आहे. महायुती सरकारने माझी लाडकी बहिण योजना आणली. बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर महायुतीचे सरकार व आपले लाडके रामभाऊ चालत आलेले आहेत. महाविकास आघाडीवाले हेच खरे संविधान विरोधी आहेत. महिला विरोधी आहेत. त्यांना या निवडणूकीच्या माध्यमांतूना धडा शिकवायचा आहे .
जलयुक्त शिवार सारख्या योजनेच्या माध्यमातून त्यांनी शिवारांना ‘जलसमृद्ध’ केले,शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावेल यासाठी ठोस उपाययोजना राबवल्या,जलयुक्तची दखल केवळ राज्य नाही तर केंद्र पातळीवर घेतली गेली.याचा आम्हाला अभिमान आहे.जलयुक्त शिवार योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा कर्जत जामखेड व राज्यालाही झाला व होत आहे.
आ.राम शिंदे साहेब यांनी कौडाने ते चांदे बुद्रुक रस्ता प्रथम डांबरीकरण केला.कौडाने ते कोंभळी रस्ता , डांबरीकरण केला . कौडाने ते मुळेवाडी रस्ता काँक्रीटीकरण करणे यास मंजुरी देण्यात आली. दगडवाडी ते मुळेवाडी रस्ता कामासाठी १० लक्ष निधीस मंजुरी दिली.तांडा वस्ती विकासासाठी भरीव काम व गावांतर्गत विविध कामे दिल्याने गावाचा कायापालट झाला असून यासाठी आ.राम शिंदे साहेब यांना कौडाणेतून भरघोस मतदान देवून शिंदे साहेब यांचे हात बळकट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जलयुक्त शिवारमुळे मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला . शेतकरी सधन झाला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. अहिल्यानगर सोलापूर रस्ता , भिगवन अमरापुर रस्त्यामुळे दळणवळण सुलभ झाले. कर्जत मधील शहरवासीयांच्या उजनी वरून पाईपलाइन आणून पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला. नाला खोलीकरण आदी कामामुळे दुष्काळी परिस्थिती कायमची मिटली. व शेतकऱ्यांचे उत्पन्न कमालीचे वाढले व तालुक्याची ओळख बागायती तालुका अशी झाली. आ. प्रा.राम शिंदे साहेब हेच खरे विकास पुत्र आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली .







