आ.रोहीत दादा पवार विक्रमी मतांनी विजयी होतील : प्रविण गोयकर

0
298
Google search engine

आ.रोहीत दादा पवार विक्रमी मतांनी विजयी होतील : प्रविण गोयकर

 

आ.रोहित दादा हे गेल्या पाच वर्षात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले आहेत. त्यांना त्यांच्या सुख दु:खात मदत केली आहे. तुम्ही जो भूमिपुत्र वगैरे गप्पा मारत असाल तरी त्यांनी जवळच्या नातेवाईक असल्याप्रमाणे लोकांना मदत केली आहे. हे सत्य नाकारून चालणार नाही.

 

आमदार झाल्यानंतर रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली. मग मतदारसंघातून जाणारी राष्ट्रीय महामार्ग, गावागावातील रस्ते, पूल बांधले, अद्ययावत शासकीय इमारती, पंचायत समिती कार्यालये, तलाठी कार्यालये, सर्व सुविधायुक्त तीन उपजिल्हा रुग्णालय, शासकीय विश्रामगृह, SRPF केंद्र, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना राहण्याची उत्तम सोय केली.

 

आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघाततील शेतकऱ्यांचा अडकलेला पीकविमा मंजूर करून आणला. मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली. सिंचनासाठी जास्तीत जास्त पाणी कसे आणता येईल याची काळजी घेतली. कधी नवे एवढा सीएसआर निधी मतदारसंघाच्या विकासासाठी खेचून आणला. जिल्हा परिषदेच्या तब्बल ४०० शाळा स्वखर्चातून डिजिटल केल्या. ज्या बँका अगोदर महिलांना कर्ज देण्यासाठी नकारघंटा देत होत्या.अशी परिस्थिती एकेकाळी होती. त्याच कर्जत जामखेड मतदारसंघात आता बँकांनी महिला बचत गटांना ३४ कोटी रुपये कर्ज दिले आहे आणि विशेष म्हणजे त्या कर्जाची परत फेड करण्याचे प्रमाण हे ९९ टक्के आहे. त्यामुळे महिला बचत गटांच्या माध्यमातून वेळेत कर्ज भरल्या जात असल्यामुळे त्या बचत गटांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या व्याज सवलतीचाही फायदा होत आहे.

सामान्य लोकांना केलेल्या मदतीबद्दल खिल्ली उडवली जाते आहे. पण अशी मदत तुम्ही का केली नाही. असा सरळ सवाल जनता विचारत असताना त्यालाही न जुमानता वेगळच काहीतरी उत्तर मिळताना दिसत आहे.

आ.रोहित दादा पवार हे मागच्या पाच वर्ष इथे आमदार राहिले आहेत. त्याची कामाची पद्धत गेल्या पाच वर्षांत लोकांना कळलेली आहे. त्यावर सामान्य जनता फिदा आहे. त्यांची सामान्य लोकाप्रती जुळून घेण्याची वृत्ती त्यांच्या मदत करण्याच्या पद्धती ह्या अनेकांनी अनुभवल्या आहेत. त्यामुळे ज्या काहीही गप्पा मारल्या जात आहेत.

काही पक्ष प्रवेश वगैरे फारच जोराने दाखवले जात आहेत. त्यात अनेक गावांत भाजप मधील जे कार्यकर्ते मुळ प्रचारापासून बाजुला आहेत.

म्हणजे यातुन नेमक काय बाहेर येणार आहे. की उगाच प्रचार् आणि वातावरण निर्मिती साठी काहीही कांगावा केला तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही.

त्यांना मतदार संघात असणारी तीन लाख जनता आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम यंत्रणा तुमच्याकडे आहे का?? असा प्रश्न विचारल्यावर त्याचे उत्तर नाही असेच मिळत असेल तर किती वाईट आहे….!!!

त्यामुळे तुमच्या मुद्द्या पेक्षा जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम यंत्रणा तुमच्याकडे नाही. तशी यंत्रणा निर्माण करण्याचे कोणतेही लक्षण तुमच्याकडे दिसत नाही. ज्या पुढारी लोकांची तुम्ही भाऊ गर्दी भाजप दाखवत आहे. ते कधी जनतेच्या कुठे कामाला आले याची कधीतरी यादी घेऊन पहा.

खोटा प्रचार बरीच शिग गाठेल अस वाटत असल तरी सामान्य जनता गेल्या काही वर्षात बरीच हुशार झाली असल्याने ती त्या गोष्टींना कधीही भुलनार नाही.

पराभव समोर दिसताच विरोधकांची पाया खालची वाळू सरकल्याने ते बिथरले असून आ.रोहित दादांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया प्रविण गोयकर यांनी व्यक्त केली.