आमदार रोहित दादा पवार हे यावेळी ७० ते ८० हजार मतांनी निवडून येतील :- सचिन नाळे

0
138
Google search engine

 

 

आमदार रोहित दादा पवार हे यावेळी ७० ते ८० हजार मतांनी निवडून येतील अशी सचिन नाळे यांनी दिली.

यावेळी बोलताना ते म्हणाले ,कार्यसम्राट आमदार रोहितदादा पवार यांच्या विकास दूरदृष्टी त्यांना भावत असून आ.रोहित दादा पवार यांच्या जनसंपर्कामुळे ते ७० ते ८० हजार मतांनी विजय संपादन करतील अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.त्यामुळेच तालुक्यातील कार्यकर्ते आ.रोहित दादांसाठी अहोरात्र मेहनत घेत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षात रोहित पवार यांनी मतदारसंघात लोकाभिमुख, प्रगतिशील आणि दूरदृष्टीपूर्ण विकासकामे केली आहेत. शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधा अशा महत्त्वाच्या क्षेत्रात सुधारणा करून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यांनी पाच वर्षात दिलेले शब्द पुर्ण केले. त्यांच्या कार्यशैलीमुळे प्रामाणिक, ध्येयवेडे आणि स्वाभिमानी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. जनसामान्यांसाठी झगडणारा, स्वाभिमानाने लोकांसाठी लढणारा असा त्यांचा लौकिक आहे. मतदारसंघाच्या कायापालट करण्याच्या ध्येयाने विकासाचे व्हिजन ठेवत त्यांनी आपल्या कामातून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. जनतेचा अपार विश्वास आणि विकासाची दूरदृष्टी असलेल्या रोहित पवार यांच्याकडे उद्याचं राज्याचे नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. विकासाचे ध्येय आणि जनहिताची निष्ठा जोपासणाऱ्या या नेत्याच्या पाठिशी पुन्हा एकदा संपूर्ण कर्जत-जामखेडकर एकवटला आहे. त्यामुळे ही निवडणुक कोणी कशावरही नेण्याचा प्रयत्न केला तरी ही निवडणूक विकास ह्या एकाच मुद्यावर होणार आहे आणि यामध्ये आमदार रोहित पवार यांची कित्येक पटीने सरशी होणार हे निश्चित आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कर्जत जामखेड हा भाग भौगलिकदृष्ट्या कमी पावसाचा भाग आहे.त्यातच हा ग्रामीण मतदार संघ असल्याने येथील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे.जलसंधारण साठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून भरीव निधी आणून विविध प्रकारचे बंधारे बांधलेच शिवाय या जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती , गेट बसवणे, गाळ काढणे , ओढ्यांचे खोलीकरण , या माध्यमातून पावसाचे पाणी साठवण्याचा आणि ते जमिनीत जिरवण्याचा प्रयत्न केला.

अवर्षणग्रस्त भाग असलेला कर्जत जामखेड मतदारसंघ पाणीदार करण्याचा आ.रोहीत दादा यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे.यासाठी त्यांनी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून आणि सीएसआरच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामासाठी भरीव निधी आणला.जलसंधारणाच्या कामांमध्ये ओढा , नदी खोलीकरण , रुंदीकरण , डीपी कट, तलावातील गाळ काढणे , तलावांचे एकत्रीकरण , डीप सीसीटी आदी कामे त्यांनी केल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली .