
सर्व सामान्य घरातील माणसाच्या मागे राहून मतदार राजाने आ . प्रा.राम शिंदे साहेब यांना साथ देण्याचे आवाहन मारुती भवाळ , किसान मोर्चा चिटणीस कर्जत तालुका यांनी केले आहे .
राम कृष्ण हरी , आपला रामभाऊ लय भारी , बाहेरचा नको , आपलाच बरा अशी म्हणत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कर्जत जामखेड मतदार संघाची विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यावर आली असून भूमिपुत्र प्रा.राम शिंदे साहेब यांनी सर्वच बाजुत निर्णायक आघाडी घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्य घरातील माणसाच्या मागे राहून त्याला मतदार संघातील मतदारांनी साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
धनदांडग्या असणाऱ्या प्रस्थापित अशा बलाढ्य शक्ती विरोधात निवडणूक लढवण्यासाठी आ.शिंदे साहेब सज्ज झाले आहेत.आ. प्रा.राम शिंदे साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. सालगड्याचा मुलगा ते आमदार मंत्री असा त्यांचा प्रवास आहे .गोरगरिबांचा नेता अशी त्याची ओळख आहे.यंदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांचा सामना रोहित पवार या धनदांडग्या प्रस्थापित शक्ती विरोधात आहे .रोहित पवारांच्या बलाढ्य यंत्रनेविरोधात लढण्यासाठी मतदार संघात कार्यकर्ते एकवटले असून मतदार राजाने आ .राम शिंदे साहेब यांना साथ देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







