



आ.प्रा.राम शिंदे साहेब आमदार झाले आणि कर्जत जामखेड तालुक्यातील दुर्गम गावापर्यंत विकास गंगा पोचली, ज्या गावांना रस्ते नव्हते ती गावे डांबरीकरणाचे जोडली, सभामंडप, अंगणवाडी, शाळेच्या इमारती, स्मशानभूमी, इ कामे केलीच पण या दुष्काळी भागात पाणी फक्त आ.प्रा.शिंदे साहेब यांच्या आशिर्वादामुळेच चालु झालं, नाहीतर चारी नेहमी कोरडीच होती, आ.शिंदे साहेब यांचे पाण्यासाठीचे आत्मदहनचे आंदोलन ते जलयुक्त शिवार मुळे अनेक बंधारे झाले. पाण्याची पातळी वाढली, आणि टँकर कमी झाले, शेती पिक उत्पादन वाढले, काहींनी खोडसाळपणा केला आणि तुकाई पाणी योजना बंद केली हे गावे वंचित राहिली तर यांचा राजकारणासाठी वापर करता येईल, पण शिंदे साहेब यांनी पुन्हा योजना चालु केली आणि यांचा खोडसाळ पना हाणून पाडला. विकास पुरुष विकासाच्या मुद्द्यावर लढतो आहे, आणि आम्ही सर्व सामान्य जनतेच्या जोरावर विकासच्या मुद्यावर मा.प्रा.राम शिंदे साहेब यांना निवडून आणणारच. आपल्या भुमिसाठी आपल्या सर्वांच्या सेवेसाठी नेहमीच शिंदे साहेब.







