
विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी आ.राम साहेबांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया अक्षय अशोक कारंडे यांनी दिली.आ.रोहित पवार यांनी गेल्या पाच वर्षात तालुक्यात कोणतीही मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली नाहीत . आ.पवार यांनी विकासाच्या नुसत्या थापा मारल्या , काम न करता नुसती जाहिरातबाजी केली.आपल्या मातीतला आपला भूमिपुत्रच आपले प्रश्न सोडवू शकतो आमदार प्रा .शिंदे साहेब हेच शास्वत विकास करू शकतात अशी पक्की खात्री सर्वसामान्य जनता तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी यांना आहे.म्हणूनच आपल्या हक्काच्या भूमिपुत्राला सर्वसामान्यांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत आहे.रोहित पवार यांनी कोणतेही लोक उपयोगी असे मोठे काम मतदार संघात केले नाही त्यांनी तरुण पिढीला फक्त बरबाद होईल असे वक्तव्य करून त्यांची डोके भडकाऊ वक्तव्य करीत आहेत तरी तरुणांनी यापासून सावध भूमिका घ्यावी.युवकांची माथी भडकून त्यांना वाईट मार्गाला लावणे हे काम काही जण करतात त्यामुळे येणाऱ्या पिढीने योग्य माणूस निवडावा
गेल्या वेळी जे युवक त्यांच्या बरोबर गेले होते त्यांची आज काय भावना आहे हे सुध्दा पडताळणी करून पहावे असेही त्यांनी यावेळी आवाहन केले .
आ.रोहित पवार यांनी जेवढे आश्वासन दिले त्यातले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही मुलांना रोजगार देतो म्हणले ड्रायव्हिंग लायसन्स देतो म्हणले कुठल्याही प्रकारचा रोजगार दिलेला नाही व कुठल्याही प्रकारचं लायसन दिलेलं नाही एक त्यांनी दिशाभूल केलेली आहे त्यामुळे रोहित पवार यांचे पार्सल बारामतीला पाठवल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही.आ.रोहीत पवार म्हणाले होते कर्जत जामखेड कर्जत मतदारसंघाची बारामती करून दाखवीन असे आश्वासन त्यांनी दिले होते तेही त्यांनी पूर्ण केलेले नाही.







