रवळगाव ला खोटे आश्वासन देऊन एमआयडीसी आ .राम शिंदेनी पळविली : संतोष खेडकर , चेअरमन आ .रोहित दादांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणार : संतोष खेडकर , चेअरमन

Google search engine

 

रवळगाव येथे एमआयडीसी करू असे राम शिंदे यांनी आश्वासन दिले होते परंतु या आश्वासनाची पूर्तता न करता कोंभळी येथे त्यांनी एमआयडीसी पळवली त्यामुळे रवळगाव येथील सामान्य नागरिक , ग्रामस्थ आ.शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड चिडून असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना धडा शिकवेल असा हल्लाबोल संतोष खेडकर , चेअरमन यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी सूरज खेडकर , पोपट खेडकर, विजय खेडकर ,सोमनाथ खेडकर, दादा वायाळ ,प्रकाश खेडकर, कृष्णा खेडकर , अण्णासाहेब खेडकरआदी पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते .

यावेळी बोलताना ते म्हणाले , नागरिकांना खोटे आश्वासन देऊन एमआयडीसी आ.राम शिंदे यांनी पळविली व येथील युवकांच्या रोजगारावर पाणी फेरण्याचे काम त्यांनी केले. आ.रोहित दादा पवार यांनी सर्व घटकांना विचारात मतदारसंघासह गाव वाड्या वस्त्यांचा सर्वसमावेशक विकास केला . रवळगाव साठी त्यांनी कोंभळी ते रवळगाव रोड , खंडोबा मंदिर सभा मंडप , रासकर वस्ती काँक्रिटीकरण , मुस्लिम बांधव दफन भूमी कंपाऊंड , उन्हाळ्यात टॅंकरने मोफत पाणी पुरवठा आदी मोठी कामे दिली. त्यामुळे त्यांना रवळगाव येथून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणार असल्याची ग्वाही संतोष खेडकर , चेअरमन यांनी दिली.