
कार्यसम्राट आ.रोहीत दादा पवार यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत खातगाव मधून १४५ मतांचे लीड दिले होते. या पंचवार्षिकला तो आकडा पार करून २०० ते २५० मतांचे लीड खातगावकर देणार आहेत अशी ग्वाही मा.सरपंच चंद्रकांत आटोळे यांनी दिली.
आ.रोहीत दादा पवार यांनी खातगाव मध्ये अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता १५ लक्ष रुपये , शिरसाई लक्ष्मी मंदिरासाठी एक सभा मंडप ८ लक्ष रुपये रुपये , गावात एक स्मशानभूमी ८ लाख रुपये ही सर्व कामे त्यांच्या मार्फत आज पूर्ण झाले आहेत. आ.रोहीत दादा पवार यांनी कुकडी पाणी हा खातगाव मधील शेतकऱ्यांसाठी जीवन मरणाचा प्रश्न होता .त्यासाठी त्यांनी खातगाव साठी ९२ चारी व आंबि DY 2 या चाऱ्यांचे दोन्ही गेट बसवून दिल्याने पाणी चाऱ्यांना वेगात पोहोचू लागले.त्यामुळे खातगाव मधील शेतकरी खुश आहेत.
आ.रोहीत दादांनी सर्वच क्षेत्रात योगदान दिले आहे. त्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये अगदी जन्माला आलेल्या बाळापासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत आमदार रोहीत दादा पवार यांनी भरीव योगदान दिले आहे . त्यामध्ये नुकतेच जन्मलेल्या बाळासाठी बेबी किट त्यांच्या मातोश्री गेली पाच वर्षं वाटत आहेत गावात दर महिन्यात त्यांची रुग्णवाहिका येऊन सर्व वृद्ध लोकांची बीपी साखर तपासून त्यांना गोळ्या औषध वाटप करतात . वर्षातून एकदा त्यांच्यामार्फत डोळ्याची शिबिर असते ते तपासणी करून पुण्यावरून ऑपरेशन करून आणून गावात रुग्णांना सुखरूप घरी सोडतात त्याचा सर्वसामान्य गरीब कुटुंबातील व्यक्तींना मोठा फायदा होतो.
कर्जत जामखेड हा भाग भौगलिकदृष्ट्या कमी पावसाचा भाग आहे.त्यातच हा ग्रामीण मतदार संघ असल्याने येथील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे.जलसंधारण साठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून भरीव निधी आणून विविध प्रकारचे बंधारे बांधलेच शिवाय या जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती , गेट बसवणे, गाळ काढणे , ओढ्यांचे खोलीकरण , या माध्यमातून पावसाचे पाणी साठवण्याचा आणि ते जमिनीत जिरवण्याचा प्रयत्न केला.
शैक्षणिक क्षेत्रामध्ये पहिली ते पाचवी पर्यंत शाळा असून त्या मुलांना अगदी पॅड , कंपास पुस्तके गावात चांगले. पाणी पिण्याची सोय नसल्यामुळे मुलांना स्वतःच्या घरचे पाणी प्यावे म्हणून त्यांनी पाण्याच्या बॉटल दिल्या व त्या मुलांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी त्यांच्यामार्फत होते आणि इयत्ता पाचवी नंतर मुलांना आंबिजळगाव चे विद्यालय तीन किलोमीटर तर लोणी दोन किलोमीटर पुढच्या शिक्षणासाठी अगदी चालत जावा लागत होते त्या मुलांचा वेळ वाचावा व अभ्यासाला वेळ मिळावा या कारणामुळे आ.रोहीत दादांनी आंबिजळगाव व लोणीला जाणाऱ्या सर्व मुलांना आ.रोहित दादा पवार यांनी ४५ ते ५० मोफत सायकल वाटप करण्यात आले . तसेच मुलांना कसे शिक्षण द्यायचे याच्याबद्दल अंगणवाडी शिक्षिका ते प्राथमिक शाळा शिक्षक यांना कर्जत येथे तीन ते चार वेळेस प्रशिक्षण देण्यात आले . तसेच शाळेसाठी ई लर्निंग सेट दिला .
शेती क्षेत्रात केव्हीके मार्फत रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामासाठी त्यांचे वडील श्री राजेंद्र दादा यांचे मार्फत केवीके मधील तज्ञ कृषी सहाय्यक दर सहा महिन्याला गावात शेतकऱ्यांसाठी सुधारित शेती कशी करावी याबद्दल शेतकऱ्यांना कृषी सल्ले व बी बियाणे मोफत देतात .तसेच महिला वर्गासाठी त्यांच्या आईने बचत गटासाठी गावात मोठे काम केले आहे. लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत आ .रोहीत दादांचे भरीव योगदान आहे .दादांची भेट घ्यायची म्हणलं तर कोणीही सर्वसाधारण व्यक्ती स्वतः फोन करू शकते व जाऊन भेटू शकते त्यासाठी कोणी ही मध्यस्थ , एखादा पुढारी मध्ये लागत नाही ही एक जमेची बाजू आहे.
कोरोनाच्या काळात सर्व लोकांची दादांनी चौकशी केली , अगदी फोन करून कोणी सर्वांच्या आरोग्याची चौकशी केली सगळे कसे आहात , बरे आहात का भीती मनात बाळगू नका तसेच स्वतःला भूमिपुत्र म्हणून घेणाऱ्या आमदारांनी गेल्या पाच वर्षात कधीही जनसंपर्क केला नाही .
आता मात्र निवडणूक येताच समोरच्यांचा अर्धा एक तासाला फोन येत असून दिवाळीच्या शुभेच्छा , मागील पाच वर्षात एकही दिवाळी झाली नाही का आत्ताच का त्यांना जनता आठवली असा सवालही त्यांनी यावेळी केला.







