
कर्जत जामखेडचे भूमिपुत्र माजी मंत्री प्रा.राम शिंदे साहेब हे विक्रमी मतांनी विजयी होणार असून त्यांच्या विजयात हातभार लावण्यासाठी तळवडी मधून त्यांना मोठे मत्ताधिक्य देणार असल्याचे धनराज तुरकुंडे यांनी निर्धार व्यक्त केला .तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आ.प्रा.राम शिंदे साहेबांच्या विजयासाठी कठोर मेहनत घेत आहेत असे ते यावेळी म्हणाले .
आ.प्रा.राम शिंदे साहेब यांनी जलसंधारण मंत्री असताना व गेली अडीच वर्षात केलेल्या विकासकामांच्या आधारे बूथ वरून मोठे लीड देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
आ.राम शिंदे साहेब पालकमंत्री असताना गावचे श्रद्धास्थान भैरवनाथ मंदिर क वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा देण्यात आला. त्यामुळे मंदिर परिसराचा कायापालट झाला व मंदिर परिसराचे सुशोभीकरण वेगात झाले . यामध्ये सभामंडप १० लक्ष निधी , पेव्हर ब्लॉक २५ लाख निधी देण्यात आला . तळवडी गावांमध्ये स्मशानभूमी व गावांतर्गत सिमेंट रोड कॉंक्रिटीकरण करणे यासाठी दहा लाख रुपये निधी दिला आहे. तळवडी ते धालवडी एक किलोमीटर डांबरीकरण करणे यासाठी १५ लाख रुपये निधी दिला . त्याचप्रमाणे चिंचेचे लवण ते तळवडी मुरूमीकरण करण्यासाठी एक लाख रुपये निधी दिला.तसेच दलीत वस्ती निधी अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले. आ . प्रा.राम शिंदे साहेबांनी लाखात नाही तर कोटीमध्ये तळवळीसाठी निधी दिलेला आहे .
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवडी येथे स्मार्ट अँड्रॉइड पॅनल LED अंदाजे रक्कम एक लाख रुपये निधी दिला.
अवर्षणग्रस्त भाग असलेला कर्जत जामखेड मतदारसंघ पाणीदार करण्याचा आ.राम शिंदे साहेब यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे.यासाठी त्यांनी विविध माध्यमातून जलसंधारणाच्या कामासाठी भरीव निधी आणला.जलसंधारणाच्या कामांमध्ये ओढा , नदी खोलीकरण , रुंदीकरण , डीपी कट, तलावातील गाळ काढणे , तलावांचे एकत्रीकरण , डीप सीसीटी आदी कामे केली. पाणी आडवा पाणी जिरवा या योजने अंतर्गत त्यांनी केले.
.आज जलयुक्त शिवार योजनेमुळे संपूर्ण कर्जत तालुका बागायती तालुका म्हणून ओळखला जावू लागला आहे याचे श्रेय हे आ. प्रा.राम शिंदे साहेब यांना जाते असे त्यांनी यावेळी सांगितले.गेली अडीच वर्षे साहेब विधान परिषदेवर आमदार झाल्यापासून कुकडी कॅनलला भरपूर पाणी सोडण्यात आल्याने शेतकरी खुश असून त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पन्नात वाढ झाली याचे श्रेय जाते ते आ.राम शिंदे साहेब यांनाच , परंतु विद्यमान आमदारांच्या अगोदरील अडीच वर्षे काळात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती परंतु त्यांनी यावर कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शब्द पूर्ण करणारे आमदार अशी कित्येक जणांना प्रचिती असणारे प्रा .आमदार राम शिंदे साहेब हेच विकासपुत्र असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मतदार राजाने आ.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या नावसमोरील कमळ या चिन्हापुढील बटन दाबून मतदान करून आपल्या गावचा व तालुक्याचा राहिलेला विकासाचा अनुशेष करण्यासाठी प्रा.आ.राम शिंदे यांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.







