
दैंनदीन जीवनात मसाले हे भाजी बनवण्यासाठी लागतातच .देशाच्या कानकोपऱ्यात कर्जत तालुक्यातील गाजलेली शिपी आमटी ही आमटी सर्वत्र नेहमीच चर्चेत असते. या शिपी आमटीचे मसाले हे आपल्या कर्जत तालुक्यातच मिळणार असून शंभू मसाले निर्मित शंभु शिपी आमटी मसाला हे आता तनपुरे सुपर मार्केट , कर्जत येथे उपलब्ध राहणार असून आपण शिपी आमटी ही घरीच बनवू शकतात. शहरात नावाजलेली शिपी आमटी ही आमटी कर्जतकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. भाजप नेते पै.प्रवीण दादा घुले यांच्या वाढदिवसानिमित्त ४ नोव्हेंबर रोजी शंभू मसाले यांचा स्पेशल शिपी आमटी मसाल्याचे लॉन्चिंग तनपुरे सुपर मार्केट , कुळधरण रोड , कर्जत येथे पार पडले.
ग्राहकांची मागणी लक्षात घेवून त्यांनी गुणवत्ता व दर्जा राखून स्पेशल शिपी आमटी मसाला तयार केला आहे. यावेळी शंभू शिपी आमटी मसाले पासून बनवलेली ३०० लिटर तयार केलेली आमटी लोकांना फ्री वाटप करण्यात आली.
त्यांची अन्य मसाले ग्राहकांसाठी नेहमी उपलब्ध आहेत परंतु ग्राहकांचा विश्वास संपादन करून व मागणी लक्षात घेवून स्पेशल शीपी आमटी मसाला त्यांनी तयार केला आहे.
खास खवय्यांसाठी गुणवत्ता व दर्जा राखून शंभू शिपी आमटी मसाला तयार करण्यात आला आहे.यावेळी बोलताना पै.प्रवीण दादा घुले पाटील म्हणाले , तनपूरे कुटुंबीयांनी सर्वच व्यवसाय नेहमीच सचोटीने आणि प्रामाणिकपणे केले आहेत. त्यांनी अगोदरच शंभू ऑईल निर्मित तेलाची सर्व प्रॉडक्ट गुणवत्ता राखत अगोदरच लाँच केली आहेत.परंतु कर्जतचा फेमस स्पेशल शिपी आमटी मसाला प्रामाणिक हेतू ठेवून कर्जत सारख्या शहरात तनपुरे कुटुंबीय माझ्या वाढदिवसानिमित्त लाँच करत आहेत याचा मला मनस्वी आनंद होत आहे. आपल्या शरीराला अपाय बाजूला भेसळीपासून दूर ठेवत हा स्पेशल शीपी आमटी मसाला मार्केट मध्ये मिळणार असून ऑनलाईन च्या जमान्यात आपल्या भागातील व्यावसायिकांना प्राधान्य देत हा मसाला खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी सचिन घुले , आंबीजळगाव चे सरपंच विलास अप्पा निकत , शरद म्हेत्रे , प्रदीप अण्णा पाटील , रामदास हजारे , शरद तनपुरे , पप्पूशेठ तोरडमल , डॉ .निकत , सुदाम धांडे , श्रीराम गायकवाड , तात्या लगड , अर्जुन शिंदे व समस्त तनपुरे परिवारातील सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी विलास निकत यांचेही भाषण झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रामदास हजारे यांनी केले .आभार बबन तात्या तनपुरे यांनी मानले.







