
कर्जत जामखेड मतदार संघाची विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यावर आली असून भूमिपुत्र राम शिंदे साहेब यांनी सर्वच बाजुने आघाडी घेतल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य घरातील व्यक्ती अर्थात प्रा .राम शिंदे साहेब यांच्या मागे राहून त्यांनी मतदान करून साथ द्यावी असे आवाहन रवळगावचे सरपंच तात्या खेडकर यांनी केले आहे.यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले .
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला .यावेळी बूथप्रमुख अशोक जाधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धनदांडग्या असणाऱ्या प्रस्थापित अशा बलाढ्य शक्ती विरोधात निवडणूक लढवण्यासाठी आ.राम शिंदे साहेब सज्ज झाले आहेत.आ. प्रा.राम शिंदे साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. सालगड्याचा मुलगा ते आमदार मंत्री असा त्यांचा प्रवास आहे .गोरगरिबांचा नेता अशी त्याची ओळख असल्यामुळे त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन केला असून होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत आ .शिंदे साहेब यांचा सामना रोहित पवार या धनदांडग्या प्रस्थापित शक्ती विरोधात आहे .रोहित पवारांच्या बलाढ्य शक्तीपुढे लढण्यासाठी मतदार संघात कार्यकर्ते एकवटले असून मतदार राजाने आ .राम शिंदे साहेब यांना कमळ चिन्हापुढे बटण दाबून साथ देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







