
माजी मंत्री भूमिपुत्र प्रा. आ.राम शिंदे साहेब यांनी सुजाण मतदारांचा विश्वास संपादन केल्याने आ.राम शिंदे साहेब यांचा विजय निश्चित होणार असल्याची प्रतिक्रिया विनय खामगळ यांनी व्यक्त केला आहे .
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला.
यावेळी सचिन खामगळ, हनुमंत खामगळ , महादेव खामगळ , सखाराम खामगळ , भाऊसाहेब खामगळ , विशाल खामगळ , तुषार कोरटकर , तात्यासाहेब कोरटकर , विशाल टुले , योगेश टुले आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की , आ.राम शिंदे साहेब यांनी मारुती मंदिर सभामंडप , डिकसळ ते थेटेवाडी रस्ता डांबरीकरण,तुकाई चारी पाईप लाईनद्वारे पाणी, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बंधारे बांधून संपूर्ण शिवार जलयुक्त , अंगणवाडी साठी नवीन इमारत बांधकाम ११ लक्ष , स्मशानभूमी बांधकाम १० लक्ष , मारुती मंदिरा समोरील परिसरात पेव्हींग ब्लॉक , थेटेवाडी परिसरातील माळढोक आरक्षण हाटवले, भगत मांढरे वस्ती लाईट डीपी मंजूर , थेटेवाडी येथे तालीम मंजूर आदी कामे दिल्याने गावाचा मोठा कायापालट झाला .
माजी मंत्री प्रा . राम शिंदे यांच्या रूपाने मतदार संघात कोट्यवधींचा निधी आणून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. कर्जत तालुक्यातील सर्वच भाग अवर्षण ग्रस्त असून वेळेत सुटलेल्या कुकडी आवर्तनाने हा भाग बागायती म्हणून ओळखला जावू लागला आहे. जलयुक्त शिवार , रस्ते , घरकुल, जलसंधारण यामुळे मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला . त्यामुळे खरे विकास पुत्र आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.
तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार कामामुळे तालुक्याचा कायापालट झाला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. अहिल्यानगर सोलापूर रस्ता , भिगवन अमरापुर रस्त्यामुळे दळणवळण सुलभ झाले. कर्जत मधील शहरवासीयांच्या उजनी वरून पाईपलाइन आणून पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला. नाला खोलीकरण आदी कामामुळे दुष्काळी परिस्थिती कायमची मिटली. व शेतकऱ्यांचे उत्पन्न कमालीचे वाढले व तालुक्याची ओळख बागायती तालुका अशी झाली. आ. प्रा.राम शिंदे साहेब हेच खरे विकास पुत्र आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली .







