
आपला तो आपलाच असतो ही भूमिका स्वीकारून प्रा. आ.राम शिंदे साहेब यांना साथ द्या देण्याचे आवाहन आखोणी खैदानवाडीचे उपसरपंच नवनाथ खराडे यांनी केले आहे.
भूमिपुत्र आमदार राम शिंदे साहेब यांचा विजय सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने निश्चित असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले , आपला तो आपलाच असतो , भूमिपुत्र आ. राम शिंदे साहेबांनी मंत्री पदात केलेली विकासकामांनी कर्जत जामखेड मतदार संघाची वेगळीच ओळख निर्माण झाली.आमदार राम शिंदे साहेब यांची सर्वसामान्य जनतेबरोबर नाळ जुळली गेली आहे. मंत्री पदाच्या काळात त्यांनी मतदार संघाचा कायापालट केला. आपल्या कर्जत जामखेड मतदार संघातील भूमीसाठी गेली २० वर्ष केलेल्या अविरत कार्यामुळे आ. राम शिंदे साहेबांना विजय निश्चित आहे .कर्जत जामखेडचा भूमीपुत्र या नात्याने आपल्या भूमीच्या उत्कर्षासाठी कर्जत जामखेड मतदार संघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी आ.शिंदे साहेबांसाठी येणारे १८ दिवस वैयक्तिक जनसंपर्क करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आखोणी खैदानवाडीसाठी २५/१५ अंतर्गत राशीन भिगवन रस्ता ते आखोणी खैदानवाडी डांबरीकरणासाठी २ कोटी रुपये , आखोणी येथे समाज मंदिर बांधणे १० लक्ष , सुळ वस्ती येथे तालीम साठी १० लक्ष , दलीत वस्ती अंतर्गत पेव्हींग ब्लॉक १० लक्ष , विठ्ठल रुक्मिणी सभा मंडप १० लक्ष , नांदणी नंदी बंधारा बांधणे ८५ लक्ष , मांजरभाई येथे सभामंडप १० लक्ष , आखोणी येथे सभा मंडप १० लक्ष , नांदनी नदीवर बुडीत बंधाऱ्यासाठी ४० लक्ष ,आखोनी खैदानवाडी विठ्ठल रुक्मिणी व सावतामाळी मंदिर बांधणे ३० लक्ष , आखोणी खैदानवाडी हनुमानबेट क्राँकिटकरण करणे १० लक्ष आखोणी खैदानवाडी लक्ष्मण सायकर वस्ती ते हनुमान बेट मारुती मंदिर मुरुमीकरण करणे १५ लक्ष , आखोणी खैदानवाडी ते मानेवाडी २ किमी डांबरीकरन करणे २ कोटी रुपये , आखोणी खैदानवाडी स्मशानभूमी सुशोभीकरन ८ लक्ष आदी निधी दिल्याने गावाचा कायापालट झाला असल्याने आखोणी, खैदानवाडी,हनुमान बेट, मांजरभाई, वडारवस्ती आदी गावातील सर्वच भागातून आ.शिंदे साहेब यांना प्रचंड मतदान होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.







