
राशीन,अहिल्यानगर येथील आदिवासी पारधी समाज विकास संस्था संचालित संकल्प वसतिगृहाच्या माध्यमातून विजय भोसले व प्रणिता भोसले हे दाम्पत्य गेली नऊ वर्षांपासून गरीब निराधार ऊसतोड वंचित भटके आदिवासी पारधी समाजातील मुलांचे त्यांचे आरोग्य पाहत शिक्षण संगोपन करत आहे. कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय केवळ लोकसभागाद्वारे हे कार्य सुरू आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना पुण्यातील सेवादीप संस्था आणि रेलफॉर फाउंडेशन तर्फे दिला जाणारा पुष्पा नथानी पुरस्कार सन्मानपत्र व दहा लाख रुपये देउन त्यांचा गौरव फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक नथानी, सामाजिक कार्यकर्त्या नीरू गोयल, टीना नाथानी यांच्या हस्ते संकल्प वसतिगृहा चे संचालक विजय भोसले यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.







