आ.प्रा.राम शिंदे साहेब यांना माळंगी, शेगुड, डोंबाळवाडी मधून मोठे मतदान होणार ; चेअर मन बाबासाहेब डोंबाळे 

Google search engine

आ.प्रा.राम शिंदे साहेब यांना माळंगी, शेगुड, डोंबाळवाडी मधून मोठे मतदान होणार असल्याची ग्वाही खंडोबा माळंगी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब डोंबाळे यांनी दिली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, माजी मंत्री प्रा . राम शिंदे यांच्या रूपाने मतदार संघात कोट्यवधींचा निधी आणून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली.

दहा लाख रुपयांचा अंतर्गत गावठाण ते दादा डोंबाळे वस्ती रस्ता क्राँकिटीकरन , बंधारा, डांबरीकरण, सभामंडप , निंबे ते डोंबाळवाडी, डोंबाळवाडी ते शेगुड रस्ता , जलयुक्त शिवार, १३.५० कोटी रुपयांची विकासकामे , आई तुळजाभवानी भवानी मंदिर पेव्हींग ब्लॉक ,देमणवाडी ते डोंबाळवाडी रस्ता अशी १३.५० कोटींची डोंबाळवाडीसाठी कामे दिली. जलसंधारण कामामुळे कर्जत जामखेड मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला.आज कर्जत तालुका विकासाच्या दिशेने मोठ्या प्रमाणत आगेकूच करत आहे.’ विकास’ काय असतो हे शिंदे साहेबांनी आपल्या ‘मंत्रिपदाच्या’कार्यकाळात दाखवून दिले. जलयुक्त शिवार , कर्जतसाठी उजनी वरून पाणी आणून शहर वासियांचा पाण्याचा प्रश्न मिटवला . सारख्या योजनेच्या माध्यमातून त्यांनी शिवारांना ‘जलसमृद्ध’ केले,शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावेल यासाठी ठोस उपाययोजना राबवल्या,जलयुक्तची दखल सर्वत्र घेतली गेली याचा आम्हाला अभिमान आहे.जलयुक्त शिवार योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा कर्जत जामखेड व राज्यालाही झाला व होत आहे.रस्ते क्राँकिटीकरन , वाडी बंधारा, डांबरीकरण,सभामंडप , निंबे ते डोंबाळवाडी , डोंबाळवाडी ते शेगुड रस्ता , जलयुक्त शिवार, १३.५० कोटी रुपयांची विकासकामे , आई तुळजाभवानी भवानी मंदिर पेव्हींग ब्लॉक ,देमणवाडी ते डोंबाळवाडी रस्ता , १० लाखांचा अंतर्गत रस्ता अशी १३.५० कोटींची कामे दिली. जलसंधारण यामुळे मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला . त्यामुळे खरे विकास पुत्र आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार कामामुळे तालुक्याचा कायापालट झाला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. अहिल्यानगर सोलापूर रस्ता , भिगवन अमरापुर रस्त्यामुळे दळणवळण सुलभ झाले. नाला खोलीकरण आदी कामामुळे दुष्काळी परिस्थिती कायमची मिटली. व शेतकऱ्यांचे उत्पन्न कमालीचे वाढले व तालुक्याची ओळख बागायती तालुका अशी झाली. आ. प्रा.राम शिंदे साहेब हे कार्यतत्पर आमदार आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली .