
कर्जत जामखेडचे भूमिपुत्र माजी मंत्री प्रा.राम शिंदे साहेब हे विक्रमी मतांनी विजयी होणार असून त्यांच्या विजयात हातभार लावण्यासाठी अळसुंदे , देमनवाडी गावातून त्यांना बूथवरून मोठे मत्ताधिक्य देणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रमेश अनारसे यांनी प्रतिक्रिया दिली
तसेच भारतीय जनता पार्टी , कर्जतचे पदाधिकारी. आ .शिंदे साहेबांसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.आ.प्रा.राम शिंदे साहेब यांनी जलसंधारण मंत्री असताना व गेली अडीच वर्षात केलेल्या विकासकामांमुळे विकासकामांच्या आधारे बूथ वरून मोठे लीड देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांसाठी संवाद साधला. यावेळी गणेश पालवे, जिजाबापु अनारसे, काका अनारसे, शिवाजी अनारसे(मेजर), विष्णु देमुंडे, जिवन साळुंके, अनिल गाडे, रेवन्नाथ अनारसे, हरिभाऊ अनारसे, बाळासाहेब अनारसे, कांतीलाल पालवे, रामभाऊ बरकडे, अतुल अनारसे, रणजित पालवे, सोमनाथ अनारसे आदी उपस्थित होते.
यावेळी ते बोलताना म्हणाले की , आ.राम शिंदे साहेब यांनी कर्जत अळसुंदे ९ किलोमिटर रस्ता डांबरीकरण करणे यासाठी ६ कोटी १० लक्ष निधी ,अळसुंदे ते राशीन २ किलोमिटर डांबरीकरण करण्यासाठी २ कोटी, देमनवाडी ते डोंबाळवाडी रस्ता ५ किलोमिटर डांबरीकरन करणे ६ कोटी ५० लक्ष, राशीन अळसुंदे रस्ता ८ किलोमिटर डांबरीकरन १० कोटी, अळसुंदे ते कोरेगाव ६ किलोमिटर रस्ता डांबरीकरण करणे ,अळसुंदे ते मरिमाता मंदिर पेव्हर ब्लॉक बसवणे , १० लक्ष गाव अंतर्गत रस्ता क्राँकीट १० लक्ष , देमनवाडी येथे हनुमान मंदीर सभा मंडप १० लक्ष , स्मशान भूमी येथे पेव्हर ब्लॉक साठी १० लक्ष , गारमाळ वस्ती येथे पेव्हर ब्लॉक १० लक्ष , शाम राव गाडे वस्ती येथे पेव्हर ब्लॉक रत्यासाठी ९ लक्ष , गोपीनाथ गाडे वस्ती येथे पेव्हर ब्लॉक साठी २ लक्ष ,राऊत आढाव वस्ती पेव्हर ब्लॉक ५ लक्ष , जिल्हा परिषद शाळा अळसुंदे , देमनवाडी येथे शाळा दुरुस्त करण्यासाठी अनुक्रमे २,२ लक्ष , देमनवाडी गाव अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसवणे ८ लक्ष ,वाघमारे वस्ती येथे ४० लक्ष रुपये खर्चाचा बंधारा मंजूर केला आहे आदी कोट्यवधी रुपयांचा निधी आ.राम शिंदे साहेब यांनी अळसुंदे, देमनवाडी गावांसाठी दिला .
आ.प्रा.राम शिंदे साहेबांनी अधिकाऱ्यांना फोन करताच कामे झालेच अशी ख्याती असणारे प्रा.आमदार राम शिंदे साहेब हेच विकासपुत्र असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मतदार राजाने आ.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या नावसमोरील कमळ या चिन्हापुढील बटन दाबून मतदान करून आपल्या गावचा व तालुक्याचा राहिलेला विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रा.आ.राम शिंदे यांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन यांनी केले आहे.







