
कर्जत जामखेडचे भूमिपुत्र माजी मंत्री प्रा.राम शिंदे साहेब हे विक्रमी मतांनी विजयी होणार असून त्यांच्या विजयात हातभार लावण्यासाठी बेलगाव मधून त्यांना मोठे मत्ताधिक्य देणार असल्याचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बेलगाव, भारतीय जनता पार्टी कर्जत अनुसूचित जाती जमाती, तालुका उपाध्यक्ष प्रतिक्रिया दिली
तसेच भारतीय जनता पार्टी , कर्जत अनुसूचित जाती जमातीचे पदाधिकारी. आ .शिंदे साहेबांसाठी अहोरात्र मेहनत घेणार आहे.
आ.प्रा.राम शिंदे साहेब यांनी जलसंधारण मंत्री असताना व गेली अडीच वर्षात केलेल्या विकासकामांमुळे बेलगाव मधील विकासकामांच्या आधारे बूथ वरून मोठे लीड देणार असल्याची ग्वाही बेलगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत मांढरे , भारतीय जनता पार्टी कर्जत अनुसूचित जाती जमाती, तालुका उपाध्यक्ष यांनी दिली.
आ.प्रा.राम शिंदे साहेबांनी बेलगाव येथे खंडोबा मंदिर ब्लॉक , गावाअंतर्गत सिमेंट रोड ,कोकण ओढा बंधारे, बेलगाव मिरजगाव रोड , भैरवनाथ मंदिर ब्लॉक , खंडोबा मंदिर सभामंडप , खंडोबा मंदिर सभामंडप शिंदे वस्ती , दोन्ही खंडोबा मंदिर सभामंडप आदी विकासकामे दिली.
1 अधिकाऱ्यांना फोन करताच कामे झालेच अशी ख्याती असणारे प्रा .आमदार राम शिंदे साहेब हेच विकासपुत्र असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मतदार राजाने आ.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या नावसमोरील कमळ या चिन्हापुढील बटन दाबून मतदान करून आपल्या गावचा व तालुक्याचा राहिलेला विकासाचा अनुशेष करण्यासाठी प्रा.आ.राम शिंदे यांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन श्रीकांत मांढरे , विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बेलगाव, भारतीय जनता पार्टी कर्जत अनुसूचित जाती जमाती, तालुका उपाध्यक्ष यांनी केले आहे.







