माजी मंत्री भूमिपुत्र प्रा. आ.राम शिंदे साहेब हेच खरे विकासपुत्र आहेत. अशी प्रतिक्रिया अशोक कदम , माही ग्रामपंचायतचे सदस्य तथा भाजपा किसान मोर्चा कर्जत तालुका सोशल मीडिया प्रमुख

यांनी व्यक्त केली . माही, जळगाव मधून आ.राम शिंदे साहेब यांना मोठे मत्ताधिकय्य देणार असल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, माजी मंत्री प्रा . राम शिंदे यांच्या रूपाने मतदार संघात कोट्यवधींचा निधी आणून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. शेतकऱ्यांसाठी विहिरी , लाडकी बहिण योजना , पी एम शेतकरी सन्मान योजना , जलयुक्त शिवार , रस्ते , घरकुल, जलसंधारण यामुळे मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला . त्यामुळे खरे विकास पुत्र आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त दिली.
तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार कामामुळे तालुक्याचा कायापालट झाला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. माही जळगाव व शेजारील गावे दुष्काळी म्हणून त्यांची ओळख आहे परंतु सीना नियमित आवर्तनामुळे माही,जळगाव परिसराची बागायती म्हणून ओळख निर्माण झाली आहे. अहिल्यानगर सोलापूर रस्ता , भिगवन अमरापुर रस्त्यामुळे दळणवळण सुलभ झाले. कर्जत मधील शहरवासीयांच्या उजनी वरून पाईपलाइन आणून पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला. नाला खोलीकरण आदी कामामुळे दुष्काळी परिस्थिती कायमची मिटली. व शेतकऱ्यांचे उत्पन्न कमालीचे वाढले व तालुक्याची ओळख बागायती तालुका अशी झाली. आ. प्रा.राम शिंदे साहेब हेच खरे विकास पुत्र आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली .







