
कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीसाठी काल बुधवारी उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली.यावेळी अर्ज भरलेल्या सर्व २३ उमेदवारांचे ३३ अर्ज वैध ठरले आहेत.भाजपचे आमदार प्रा.राम शिंदे यांच्या अर्जावर सतीश कोकरे यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आ.रोहित दादा पवार यांच्या अर्जावर विकास भगवंत राळेभात यांनी हरकत नोंदवली होती मात्र प्रांत अधिकारी नितीन पाटील यांनी युक्तिवाद ग्राह्य धरत उपस्थित केलेल्या हरकती फेटाळून लावत दोन्ही अर्ज कायम ठेवले.यावेळी कर्जत जामखेड विधानसभेच्या डी.रत्ना उपस्थित होत्या .
पक्ष व उमेदवार
कोठारी रवींद्र लिलाचंद- महाराष्ट्र नवनिर्माण सेना
दत्तात्रय आत्माराम सोनवणे – बहुजन समाज पार्टी
रामदास शंकर शिंदे – भारतीय जनता पार्टी
रोहीत राजेंद्र पवार – नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी
करण प्रदीप चव्हाण – रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया(A)
पिसाळ अंबादास शंकर – महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
राम प्रभू शिंदे – ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक
सोमनाथ हरिभाऊ भैलूमे – वंचित बहुजन आघाडी
स्वप्नील पोपटलाल देसाई – राष्ट्रीय समाज पक्ष
हनुमंत देविदास पावणे – महाराष्ट्र राज्य समिती
अशा वेगवेगळ्या पक्षाचे दहा उमेदवार आहेत.
पुढील तेरा उमेदवार अपक्ष आहेत.
अप्पा नवनाथ पालवे
आशाबाई रामदास शिंदे
कैलास शंकरराव शेवाळे
युनूस दगडु शेख
राम नारायण शिंदे
रोहीत चंद्रकांत पवार
रोहीत सुरेश पवार
विकास भगवंत राळेभात
विकास मिठूलाल मासाळ
शहाजी विश्वनाथ उबाळे
शेटे पोपट एकनाथ
सतीश शिवाजी कोकरे
हनुमंत रामदास निगुडे
वरील सर्व अपक्ष







