राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कर्जत तालुका उपाध्यक्ष पदी अंकुश खराडे यांची निवड

Google search engine

 

कर्जत तालुक्याच्या दक्षिण भागात भाजपाला मोठे खिंडार पडले असून भाजपा तालुका उपाध्यक्ष व भाजपा स्थापनेपासूनचे निष्ठावंत कार्यकर्ते अंकुश नाना खराडे यांनी राम शिंदे व पक्षातील मनमानीला कंटाळुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये काल आमदार रोहित दादा पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला व त्यांची तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली

आ.रोहित दादा पवार यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष नितीन धांडे उपस्थित होते.

त्यांना दिलेल्या निवडपत्रात म्हटले आहे की , पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्र पवार साहेब ,संसदरत्न खा.सुप्रिया सुळे , आ.रोहित दादा पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचावेत व पक्ष वाढी साठी भरीव काम करावे.

यावेळी बोलताना अंकुश खराडे म्हणाले की , आ.रोहित दादा पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उपाध्यक्ष पदाची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहील.येणाऱ्या काळात पक्ष विस्तार , संघटन कौशल्य वाढविणार असून पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.