तीन राम शिंदे , तीन रोहित पवार 

0
1172
Google search engine

 

कर्जत जामखेड विधान सभा मतदार संघासाठी २३ जनांनी मिळून ३७ अर्ज दाखल केले आहेत . काल मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राम प्रभू शिंदे , आणि राम नारायण शिंदे ( रा. कोळवडी , जिल्हा बीड यांनी अनुक्रमे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्ष व अपक्ष अर्ज दाखल केला आहे.भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रा.राम शंकर शिंदे कर्जत मध्ये तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.तसेच रोहित सुरेश पवार सुपे ता.कर्जत , रोहित चंद्रकांत पवार सरदवाडी ता.जामखेड या दोघांनी अपक्ष अर्ज दाखल केला असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित राजेंद्र पवार यांच्या सह एकुण तीन रोहित पवार नावाचे नामांकन अर्ज दाखल झाले आहेत.४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यानंतरच अंतिम लढतीचे चित्र व चिन्ह स्पष्ट होईल .