
माजी मंत्री भूमिपुत्र प्रा. आ.राम शिंदे साहेब हेच खरे विकासपुत्र असून वडगाव तनपुरा मधून त्यांना विधानसभा निवडणुकीत मोठे लीड देणार असल्याचा निर्धार बापू निकम यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, माजी मंत्री प्रा .राम शिंदे यांच्या रूपाने मतदार संघात कोट्यवधींचा निधी आणून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली.
आ.राम शिंदे साहेब यांच्या प्रयत्नाने वडगाव तनपुरा मध्ये ग्रामीण उप रुग्णालय , वडगाव ते तनपुरे वस्ती रस्ता , वडगाव तनपुरे ते निकम वस्ती रस्ता , वडगाव तनपुरा ते निकम वस्ती रस्ता , भैरवनाथ मंदिरापुढे सौर ऊर्जाची मोठी वीज बसवली , भैरवनाथ सभा मंडप , निकम वस्तीवर सभा मंडप , लगड वस्ती व सभा मंडप , नवीन पाणीपुरवठा मोठी टाकी बांधून गावाला पाणी देण्याचे काम , जलयुक्त शिवारा मार्फत सर्व ओढे , नाले खोलीकरण केले आदी विकासकामे झाली आहेत राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते गावांसाठी २.५ कोटी निधी दिला म्हणतात परंतु ते काय दिसत नाहीत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
‘शाश्वत विकास’ काय असतो हे शिंदे साहेबांनी आपल्या ‘मंत्रिपदाच्या’कार्यकाळात दाखवून दिले.जलयुक्त शिवार सारख्या योजनेच्या माध्यमातून त्यांनी शिवारांना ‘जलसमृद्ध’ केले,शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावेल यासाठी ठोस उपाययोजना राबवल्या,जलयुक्तची दखल केवळ राज्य नाही तर केंद्र पातळीवर घेतली गेली.याचा आम्हाला अभिमान आहे.जलयुक्त शिवार योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा कर्जत जामखेड व राज्यालाही झाला व होत आहे.
अंतर्गत रस्ते क्राँकिटकरन, बंधारे, डांबरीकरण,
जलयुक्त शिवार, सभा मंडप ,
,वाड्या वस्त्यांना जोडणारे रस्ते , घरकुल, जलसंधारण यामुळे मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला . त्यामुळे खरे विकास पुत्र आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार कामामुळे तालुक्याचा कायापालट झाला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. अहिल्यानगर सोलापूर रस्ता , भिगवन अमरापुर रस्त्यामुळे दळणवळण सुलभ झाले. कर्जत मधील शहरवासीयांच्या उजनी वरून पाईपलाइन आणून पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला. नाला खोलीकरण आदी कामामुळे दुष्काळी परिस्थिती कायमची मिटली. व शेतकऱ्यांचे उत्पन्न कमालीचे वाढले व तालुक्याची ओळख बागायती तालुका अशी झाली. आ. प्रा.राम शिंदे साहेब हेच खरे विकास पुत्र असून ते मोठ्या मतांनी विजयी होतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली .







