
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A ( आंबेडकर ) या पक्षा कडून करण भाऊ चव्हाण कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातून काल उमेदवारी अर्ज भरला .
यावेळी जिल्हा अध्यक्ष मा श्री.निलेश भाऊ गायकवाड ,मा.सचिन भाऊ घोडके जिल्हा उपाध्यक्ष ,मा.नाना सांगळे जिल्हा सचिव मा. गणेश सांगळे जिल्हा संघटक.मा.भगवान गजरमल – तालुका अध्यक्ष , मा.युवराज शिंदे – तालुका सचिव , मा.भाऊसाहेब चव्हाण तालुका उपाध्यक्ष , मा.नामदेव गलांडे – तालुका सहसचिव ,मा.कुलदीप शेलार – तालुका संघटक ,मा.संदीप हरिभक्त – तालुका सहसंघटक
मा.फरीद इनामदार श्रीगोंदा शहराध्यक्ष , मा.नितीन चव्हाण, मा.कपिल चव्हाण मा.प्रवीण चव्हाण, मा.तानाजी थोरात, मा.योगेश चव्हाण, मा.अनिकेत ठोकले मा.रितेश घाडगे, मा.दत्ता शिंदे,मा.अजित चव्हाण,मा.महेश थोरात,मा.भीमराव चव्हाण मा.आकाश राजपूत आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकार बांधवांशी संवाद साधताना
करन चव्हाण म्हणाले की कर्जत जामखेड मतदार संघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A (आंबेडकर ) यांनी मला उमेदवारी दिली असून आज नामांकन अर्ज भरला .
विद्यमान आमदारांनी कोणतेही विकासकामे केली नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात कर्जत जामखेड मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे. सर्व कार्यकर्ते यासाठी अहोरात्र मेहनत आहेत. सर्व कार्यकर्त्यांच्या खंबीर साथीने मी ही निवडणूक लढवत आहे. कर्जत जामखेड मतदार संघात कर्जत जामखेड मधील दोन्ही विद्यमान आमदारांच्या विकासकामांतील अपयशामुळे या मतदार संघात बदल निश्चित आहे .







