
माजी मंत्री प्रा.राम शिंदे साहेबांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या बेलगाव मधील विकासकामांच्या आधारे बूथ वरून लीड देणार असल्याची ग्वाही बेलगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य तुषार गवारे यांनी दिली.
आ.प्रा.राम शिंदे साहेबांनी खंडोबा मंदिर ब्लॉक , गावाअंतर्गत सिमेंट रोड ,कोकण ओढा बंधारे, बेलगाव मिरजगाव रोड , भैरवनाथ मंदिर ब्लॉक , खंडोबा मंदिर सभामंडप , खंडोबा मंदिर सभामंडप शिंदे वस्ती , दोन्ही खंडोबा मंदिर सभामंडप आदी विकासकामे दिली. कधीही कामासाठी फोन केला की काम करणारा आमदार यामुळे बेलगाव मधील दोन्हीही बूथ मधून जास्त मताधिक्य देणार असल्याची माहिती त्यांनी दिली . तसेच सुजाण मतदारांनी आ.प्रा.राम शिंदे साहेबांना मतदान करून आपल्या गावचा व तालुक्याचा राहिलेला विकासाचा अनुशेष करण्यासाठी प्रा.आ.राम शिंदे यांना मतदान करण्याचे आवाहन बेलगाव चे माजी ग्रामपंचायत सदस्य तुषार गवारे यांनी केले आहे.







