
कृषीवेद सेंद्रिय उत्पादने व कांस्यथाळी पादाभ्यांग या दुकानाचे उद्घाटन गोपालक ह.भ.प. केशवदास महाराज व दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . संजय नगरकर यांच्या हस्ते झाले. कर्जत शहरात प्रथमच जहागीरदार कॉमलेक्स, कुळधरण रोड या ठिकाणी कृषीवेद सेंद्रिय उत्पादने व कांस्यथाळी फूट मसाज सेंटर सुरू झाले असून ग्राहकांना एकाच छताखाली सर्व प्रकारची सेंद्रिय उत्पादने मिळणार आहेत सेंद्रिय धान्य, कडधान्य व सर्व प्रकारच्या डाळी, गुळ, मध, सेंद्रिय देशी गाईचे तूप, पूर्णपणे गव्हाच्या पीठ व साजूक तुपापासून बनवलेले बिस्किटस, विविध प्रकारचे पंचगव्य औषधी, विविध प्रकारची मातीची भांडी, अग्निहोत्र पात्र उपलब्ध आहेत. वरील सर्व उत्पादने कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले आहेत. तसेच या ठिकाणी पायाला तुप आणि तेलाने आधुनिक कांस्यथाळी मशीनद्वारे मसाज केली जाईल. उद्धाटन प्रसंगी कर्जत शहरातील तसेच पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क:
अगस्तीऋषी तोरडमल
९९२२४८९०४० , ८६२५०६००९६






