कर्जत तालुक्यामध्ये झळकले बॅनर , पाठिंबा कोणाला ?

तालुक्यात कट्टर आणि हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ओळखले जाणारे पप्पू शेठ शहाणे हे विधानसभा निवडणुकीत कुणाला पाठिंबा देतात हे गुलदस्त्यात असून त्यांच्या फोटोंसह पाठिंबा कोणाला असे आशयाचे फलक कर्जत मध्ये झळकले आहेत . ते मृत्यूंजय ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष असून त्यांची तालुक्यात ७००० सदस्य संख्या आहे .तालुक्यात राम नवमी असो , गणपती उत्सव व इतर उत्सव धूमधडाक्यात साजरा करतात.कर्जत शहर मध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य म्हणून ओळखले जाणारे त्यांचे नाव आहे. तालुक्यात असंख्य असा मित्र परिवार पप्पू शेठ शहाणे यांच्या कडे आहे.इंजिनिअर स्वप्निल शहाणे हेही ग्रुप चे सदस्य म्हणून पप्पू शेठ यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करत आहेत , तालुक्यात त्यांचा ही ठेकेदार मित्र परिवाराशी मोठा संपर्क आहे.त्यांच्या ग्रुप ची भूमिका तालुक्यात किंगमेकर ठरणार असून झळकेकल्या बॅनर ने ते कुणाला पाठिंबा देतात याची उत्सुकता वाढली आहे.







