आ.रोहित दादा पवार विक्रमी मतांनी विजयी होतील : युवा उद्योजक मनोज मुळे  

Google search engine

 

लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांच्या कामाच्या जोरावर आणि लोकांचा प्रत्यक्ष संपर्क या जोरावर आमदार रोहितदादा पवार हे एक लाख मताधिक्य घेऊन निवडून येतील अशी प्रतिक्रिया युवा उद्योजक मनोज मुळे यांनी दिली.

 

आ.रोहित दादा पवार यांनी काल नामांकन अर्ज दाखल केला त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी

 

डॉ सुनील मुळे, संतोष भाऊ मुळे,स्वप्निल मुळे, सुभाष मुळे, वैभव मुळे, सचिन मुळे ,गणेश जगताप, अक्षय मुळे, कल्याण मुळे, युवराज मुळे, कृष्णा मोहिते, ऋतुराज मुळे, ओमकार जगताप, विशाल जगताप, विकास महाराज मुळे उपस्थित होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की , मतदार संघात आतापर्यंत हजारो कोटींची कामे आमदार रोहितदादा पवार यांनी केलेली आहेत.लोकांत जाऊन काम करणारा आमदार म्हणून रोहितदादा यांची ओळख आहे तेच खरे भूमिपुत्र आहेत. पाणी,आरोग्य,शिक्षण, बेरोजगारी,उद्योग या क्षेत्रात चांगले काम केले आहे.

त्यांनी सर्व कार्यालय एकत्रित असलेली , १०० बेडचे सुसज्ज अद्ययावत शासकीय हॉस्पिटल , पंचायत समिती वरचा मजला सर्व विभागाचे एकत्रीकरण , कोर्टाचा वरचा मजला , ऑक्सीजन प्लांट , अत्यावश्यक सेवा , नगरपंचायतची अद्ययावत व सुसज्ज इमारत , व्यावसायिकांना नगरपंचायत चे १०९ गाळे , श्री. संत सदगुरु गोदड महाराज:भक्तांना भक्ती निवास , अद्ययावत शासकीय रेस्ट हाऊस , पोलीस कर्मचारी वसाहत , शासकीय आरोग्य कर्मचारी वसाहत , बस डेपो, वर्कशॉप इमारत व व्यावसायिक गाळे , ५ भागात सिंगल फेज डीपी. मा.रोहीत दादांनी या इमारती सोबतच शिक्षण, आरोग्य,

अंगणवाडी मध्ये आधुनिक खेळातून शिक्षण मिळेल अशी खेळणी,प्राथमिक शाळेत डिजिटल क्लास रूम, माध्यमिक शाळेतीळ वाडी वस्ती वरून जाण्या-येण्यासाठी दर्जेदार सायकली, आरोग्य सुविधा ही कामे केली.

आमदार रोहितदादा पवार यांच्या विकास दूरदृष्टी त्यांना भावत असून आ.रोहित दादा पवार यांच्या जनसंपर्कामुळे ते मोठ्या मतांनी विजय संपादन करतील अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. गेल्या पाच वर्षात रोहित पवार यांनी मतदारसंघात लोकाभिमुख, प्रगतिशील आणि दूरदृष्टीपूर्ण विकासकामे केली आहेत. शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधा अशा महत्त्वाच्या क्षेत्रात सुधारणा करून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यांनी पाच वर्षात दिलेले शब्द पुर्ण केले. त्यांच्या कार्यशैलीमुळे प्रामाणिक, ध्येयवेडे आणि स्वाभिमानी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. जनसामान्यांसाठी झगडणारा, स्वाभिमानाने लोकांसाठी लढणारा असा त्यांचा लौकिक आहे. मतदारसंघाच्या कायापालट करण्याच्या ध्येयाने विकासाचे व्हिजन ठेवत त्यांनी आपल्या कामातून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. जनतेचा अपार विश्वास आणि विकासाची दूरदृष्टी असलेल्या रोहित पवार यांच्याकडे उद्याचं राज्याचे नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. विकासाचे ध्येय आणि जनहिताची निष्ठा जोपासणाऱ्या या नेत्याच्या पाठिशी पुन्हा एकदा संपूर्ण कर्जत-जामखेडकर एकवटला आहे. त्यामुळे ही निवडणुक कोणी कशावरही नेण्याचा प्रयत्न केला तरी ही निवडणूक विकास विरुद्ध विकासाचे मारेकरी ह्या एकाच मुद्यावर होणार आहे आणि यामध्ये आमदार रोहित पवार यांची कित्येक पटीने सरशी होणार हे निश्चित आहे .