कोरेगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातून आ.रोहित दादा पवार यांना सर्वाधिक लीड देणार : प्रा.प्रकाश धांडे 

Google search engine

 

कार्यसम्राट आ.रोहित पवारांचे कट्टर समर्थक व सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे

 

प्राध्यापक प्रकाश धांडे सर यांनी कोरेगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातून आ.रोहित दादा पवार यांना सर्वाधिक लीड देणार असल्याची ग्वाही दिली. आ.रोहित दादा पवार हे उद्या नामांकन अर्ज भरणार असून त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

तालुक्याचे जेष्ठनेते स्वर्गीय रामभाऊ धांडे यांचे ते पुतणे असून २०१२ साली कोरेगाव पंचायत समिती गणातून काँग्रेस च्या तिकिटावर निवडणूक लढवून कमी कालावधीत त्यांनी कडवी झुंज दिली होती .रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयातून ३१ वर्षे सेवा करून हजारो विद्यार्थी घडविण्याचे काम त्यांनी केलेले आहे , नुकतेच ते सेवानिवृत्त झाले.

आ.रोहित दादा पवार यांनी विकास कामांच्या आणि लोकांचा प्रत्यक्ष संपर्क या जोरावर कार्यतत्पर आमदार रोहितदादा पवार हे एक लाख मताधिक्य घेऊन निवडून येतील असे ते यावेळी बोलताना म्हणाले. आमदार रोहितदादा पवार यांच्या विकासात्मत दूरदृष्टी त्यांना भावते. मतदार संघात आता पर्यंत हजारो कोटींची कामे रोहितदादा पवार यांनी केलेली आहेत . लोकांत जाऊन काम करणारा आमदार म्हणून रोहितदादा यांची ओळख आहे तेच खरे भूमिपुत्र आहेत असेही ते यावेळी म्हणाले . आ.रोहित दादा पवार यांचा मोठा जनसंपर्क असून पाणी,आरोग्य,शिक्षण, बेरोजगारी,उद्योग या क्षेत्रात चांगले काम केले आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले .आमदार राम शिंदे साहेबांनी १० वर्षात मतदार संघात काय आणले याचा हिशेब द्यावा असेही चॅलेंज त्यांनी यावेळी दिले .