
माजी मंत्री भूमिपुत्र प्रा. आ.राम शिंदे साहेब हेच खरे विकासपुत्र आहेत. अशी प्रतिक्रिया भाजपा किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष दत्ता नलवडे यांनी यावेळी दिली . यावेळी बोलताना म्हणाले, माजी मंत्री प्रा . राम शिंदे यांच्या रूपाने मतदार संघात कोट्यवधींचा निधी आणून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. जलयुक्त शिवार , रस्ते , घरकुल, जलसंधारण यामुळे मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला . त्यामुळे खरे विकास पुत्र आहेत अशी प्रतिक्रिया दत्ता नलवडे यांनी दिली.
तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार कामामुळे तालुक्याचा कायापालट झाला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. अहिल्यानगर सोलापूर रस्ता , भिगवन अमरापुर रस्त्यामुळे दळणवळण सुलभ झाले. कर्जत मधील शहरवासीयांच्या उजनी वरून पाईपलाइन आणून पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला. नाला खोलीकरण आदी कामामुळे दुष्काळी परिस्थिती कायमची मिटली. व शेतकऱ्यांचे उत्पन्न कमालीचे वाढले व तालुक्याची ओळख बागायती तालुका अशी झाली. आ. प्रा.राम शिंदे साहेब हेच खरे विकास पुत्र आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली .







