आ . प्रा.राम शिंदे साहेब विक्रमी मतांनी विजयी होतील :अमोल सांगळे

Google search engine

 

कर्जत जामखेड मधील सुजाण मतदारांनी आ.प्रा.रामजी शिंदे साहेबांना मतदान करून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रा.आ.राम शिंदे यांना मतदान करून विक्रमी मतांनी विजयी आवाहन करण्याचे अमोल सांगळे यांनी केले आहे.
ते यावेळी बोलताना म्हणाले , भूमिपुत्र आमदार राम शिंदे साहेबांना विधानसभा उमेदवारीचा काल फॉर्म भरताच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व वरिष्ठ नेत्यांनी जल्लोष व्यक्त करत आ. राम शिंदे साहेब यांच्या विजयाचा संकल्प केला .
यावेळी बोलताना युवा नेते अमोल सांगळे म्हणाले की , सिद्धटेक व परिसरातील गावांचा कायापालट करण्याचे काम आ.राम शिंदे साहेब यांनी केले आहे.त्यामुळे या भागातून त्यांना मोठे मत्ताधिक्य मिळणार आहे.
माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे यांनी जनतेचा सेवक म्हणून काम केले आहे . त्यामुळे पक्षाने त्यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी बहाल केली. कर्जत-जामखेडमध्ये होणारी निवडणूक सामान्य नाही, मागील पाच वर्षात मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मोठा संघर्ष करावा लागला.परंतू यंदा विरोधकाला असे हरवा की, यापुढेही कोणत्याही बाहेरच्या उमेदवाराला तुमच्या मतदारसंघात येऊन निवडणूक लढवण्याची इच्छा झाली नाही पाहिजे. त्यासाठी मोठ्या ताकदीने कामाला लागा, जोश आणि बुध्दीने ही निवडणूक लढवा, कर्जत जामखेडच्या स्वाभिमानासाठी आणि आपल्या मातीतल्या भूमिपुत्राला जिंकून आणण्यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले.
आपला तो आपलाच असतो ,स्थानिक नेते , कार्यकर्ते यांच्या स्वप्नांचा आ.रोहित पवार यांनी केलेला भ्रमनिरास यामुळेच आ.राम शिंदे यांना आपला तो आपलाच असतो असे म्हणत सर्व नेत्यांनी एकत्र येत प्रेमळ,शांत,संयमी,असलेल्या प्रा. राम शिंदे यांना साथ दिली पाहिजे. मतदारसंघातील प्रश्नावर आ.पवार कोणतेही लक्ष घालत नाहीत. मतदासंघात अभावानेच दिसणारे रोहित पवार आता कर्जत जामखेड करांना नकोसे वाटू लागले आहेत.
भूमिपुत्र आ. राम शिंदे साहेबांनी मंत्री पदात केलेली विकासकामांनी कर्जत जामखेड मतदार संघाची वेगळीच ओळख निर्माण झाली.आमदार राम शिंदे साहेब यांची सर्वसामान्य जनतेबरोबर नाळ जुळली गेली आहे. मंत्री पदाच्या काळात त्यांनी मतदार संघाचा जलसंधारण व इतर कामांनी मतदार संघाचा कायापालट केला. आपल्या कर्जत जामखेड मतदार संघातील भूमीसाठी गेली २० वर्ष केलेल्या अविरत कार्यामुळे आ. प्रा .राम शिंदे साहेबांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर झाली.कर्जत जामखेडचा भूमीपुत्र या नात्याने आपल्या भूमीच्या उत्कर्षासाठी कर्जत जामखेड मतदार संघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी आ.शिंदे साहेबांसाठी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.