भूमिपुत्र प्रा. आ.राम शिंदे ५० हजार मतांनी निवडून येतील : महेंद्र कोळेकर  

Google search engine

माजी मंत्री भूमिपुत्र प्रा. आ.राम शिंदे हे ५० हजार मतांनी निवडून येतील अशी प्रतिक्रिया महेंद्र कोळेकर यांनी व्यक्त केली . हंडाळवाडी येथील भाजप कार्यकर्ते तथा किसान मोर्चा कार्यकारिणी सदस्य महेंद्र कोळेकर यावेळी बोलताना म्हणाले, माजी मंत्री प्रा . राम शिंदे यांच्या रूपाने मतदार संघात कोट्यवधींचा निधी आणून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. रस्ते , घरकुल, जलसंधारण कामे आदी विकासकामांमुळे मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला . तालुक्यात झालेल्या जलसंधारण कामामुळे तालुक्याचा कायापालट झाला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. अहिल्यानगर सोलापूर रस्ता , भिगवन अमरापुर रस्त्यामुळे दळणवळण सुलभ झाले. कर्जत मधील शहरवासीयांच्या उजनी वरून पाईपलाइन आणून पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला. नाला खोलीकरण आदी कामामुळे दुष्काळी परिस्थिती कायमची मिटली. तसेच राहिलेल्या कामाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आ. प्रा.राम शिंदे साहेब यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.