भूमिपुत्र आ. प्रा .राम शिंदे साहेब विक्रमी मतांनी विजयी होतील : भाजपा किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष दत्ता नलवडे

Google search engine

 

कर्जत जामखेड मधील सुजाण मतदारांनी आ.प्रा.रामजी शिंदे साहेबांना मतदान करून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रा.आ.राम शिंदे यांना मतदान करून विक्रमी मतांनी विजयी आवाहन करण्याचे

भाजपा किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष दत्ता नलवडे यांनी केले आहे.

ते यावेळी बोलताना म्हणाले , भूमिपुत्र आमदार राम शिंदे साहेबांना विधानसभा उमेदवारीचा काल फॉर्म भरताच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व वरिष्ठ नेत्यांनी जल्लोष व्यक्त करत आ. राम शिंदे साहेब यांच्या विजयाचा संकल्प केला .

यावेळी बोलताना

भाजपा किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष, दत्ता नलवडे म्हणाले की , कुंभेफळ, निंबे

, अळसुंदे, आंबिजळगाव, धांडेवाडी , नेटकेवाडी, कोरेगाव, शेगुड, माळंगी , डोंबाळवाडी, बेनवडी आदी परिसरातून आमदार राम शिंदे साहेबांना मोठी मते मिळणार आहेत. आमदार प्रा राम शिंदे यांनी जनतेचा सेवेकरी म्हणून काम केले. त्यामुळे पक्षाने त्यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी बहाल केली. लाडकी बहिण योजना , मोफत वीज, किसान सन्मान निधी व इतर योजनांमुळे भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार अर्थात प्रा.राम शंकर शिंदे साहेब विजयी होतील. कर्जत-जामखेडमध्ये होणारी निवडणूक सामान्य नाही,विद्यमान आमदारांनी कोणतीही विकासकामे केली नाहीत फक्त भुलवाभुलवी केली, मागील पाच वर्षात मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मोठा संघर्ष करावा लागला.परंतू यंदा विरोधकाला असे हरवा की, यापुढेही कोणत्याही बाहेरच्या उमेदवाराला तुमच्या मतदारसंघात येऊन निवडणूक लढवण्याची इच्छा झाली नाही पाहिजे. त्यासाठी मोठ्या ताकदीने कामाला लागा, जोश आणि बुध्दीने ही निवडणूक लढवा, कर्जत जामखेडच्या स्वाभिमानासाठी आणि आपल्या मातीतल्या भूमिपुत्राला जिंकून आणण्यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले.

आपला तो आपलाच असतो ,स्थानिक नेते , कार्यकर्ते यांच्या स्वप्नांचा आ.रोहित पवार यांनी केलेला भ्रमनिरास यामुळेच आ.राम शिंदे यांना आपला तो आपलाच असतो असे म्हणत सर्व नेत्यांनी एकत्र येत प्रेमळ,शांत,संयमी,असलेल्या प्रा. राम शिंदे यांना साथ दिली पाहिजे. मतदारसंघातील प्रश्नावर आ.पवार कोणतेही लक्ष घालत नाहीत. मतदासंघात अभावानेच दिसणारे रोहित पवार आता कर्जत जामखेड करांना नकोसे वाटू लागले आहेत.

भूमिपुत्र आ. राम शिंदे साहेबांनी मंत्री पदात केलेली विकासकामांनी कर्जत जामखेड मतदार संघाची वेगळीच ओळख निर्माण झाली.आमदार राम शिंदे साहेब यांची सर्वसामान्य जनतेबरोबर नाळ जुळली गेली आहे. मंत्री पदाच्या काळात त्यांनी मतदार संघाचा जलसंधारण व इतर कामांनी मतदार संघाचा कायापालट केला. आपल्या कर्जत जामखेड मतदार संघातील भूमीसाठी गेली २० वर्ष केलेल्या अविरत कार्यामुळे आ. प्रा .राम शिंदे साहेबांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर झाली.कर्जत जामखेडचा भूमीपुत्र या नात्याने आपल्या भूमीच्या उत्कर्षासाठी कर्जत जामखेड मतदार संघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी आ.शिंदे साहेबांसाठी येणाऱ्या २५ दिवस वैयक्तिक जनसंपर्क करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.