भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा राशीन शहाराध्यक्ष पदी ओम काशीद यांची निवड

Google search engine

 

भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा राशीन शहाराध्यक्ष पदी ओम काशीद यांची निवड करण्यात आली.निवडीचे पत्र माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे , तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नीलकंठ शेळके, राशीन शहराध्यक्ष पै.शिवाजी काळे यांच्या उपस्थितीत त्यांना देण्यात आले.

दिलेल्या निवडपत्रात म्हटले आहे की , आपण पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी अथक परिश्रम कराल .यावेळी बोलताना ओम काशीद म्हणाले की, आ. प्रा. राम शिंदे साहेब , तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, युवा मोर्चा अध्यक्ष कर्जत तालुका नीलकंठ शेळके राशीन शहर अध्यक्ष पै. शिवाजी काळे आदींनी माझ्यावर सोपवलेल्या पदाला मी योग्य न्याय देणार असून असून पक्ष संघटन , बळकटीकरण करण्यासाठी अथक परिश्रम करणार आहे.निवडीबद्दल ओम काशीद यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.