आ.रोहित दादा पवार यांना मिरजगाव गटातून विक्रमी मत्ताधिक्य देणार : गुलाब काका तनपुरे

Google search engine

 

आ.रोहित दादा पवार यांना मिरजगाव गटातून विक्रमी मत्ताधिकय्य देवून विजयी करणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य गुलाब काका तनपुरे यांनी दिली.

यावेळी ते बोलताना म्हणाले , मिरजगाव गटाला आ.रोहित दादा पवार यांनी विक्रमी निधी दिल्यामुळे गटाचा कायापालट झाला आहे. मिरजगाव जिल्हा परिषद शाळेसाठी ५ कोटी रुपये देवून अद्ययावत अशी इमारत उभा करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर केला. शेतकऱ्यांना धान्य साठवण्यासाठी धान्य कोठार, सीना धरणाचे नियमित आवर्तन देवून मिरजगाव गटातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले , याचे श्रेय जाते ते फक्त आ.रोहित दादा पवार साहेब यांना .

अहिल्यानगर – सोलापूर राष्ट्रीय महामार्गामुळे दळणवळण सुलभ झाले तसेच शेतकऱ्यांचा शेतमाल ने आन करण्यासाठी या महामार्गाचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला आहे. एमआयडीसी हा प्रलंबित प्रश्न मिटवण्यासाठी आ.रोहित दादा यांना मिरजगाव जिल्हा परिषद गटातून मोठे मत्ताधिक्य देवून आ.रोहित दादा पवार यांचे हात बळकट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच सिना धरणाची उंची दीड मीटर ने वाढवून दीड टीएमसी पाणी अतिरिक्त पाणी वाढण्यासाठी आ.रोहित दादा यांना आमदार करून मंत्री करायचे आहे असे त्यांनी सांगितले. मिरजगाव येथे ट्रॉमा सेंटर आदी प्रश्नांसाठी व विकासाचा राहिलेला अनुशेष भरून काढण्यासाठी आ.रोहित दादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मिरजगाव येथील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमीपूजन, जल जीवन मिशन अंतर्गत ९ कोटी रुपयांवरून २२ कोटी निधी नेल्यामुळे सर्वत्र पाणी पोहचल्याने मायमाऊल्यांच्या डोक्यावरील हंडा कायमचा उतरला. विशेष तीखी, शिवाचा  मळा ओढा खोलीकरण , अंतर्गत रस्ते क्राँकिटीकरण, महिला सक्षमीकरण , बचत गट , ओढे खोलीकरण , शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप , निमगाव गांगर्डा येथील पुल , उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई असताना आ.रोहित दादा पवार यांनी कोणताही जात,धर्म,पंथ,पक्ष न बघता मोफत पाणी वाटप केले.तसेच एमआयडीसी सारखा प्रलंबित प्रश्न मिटवून तरुणांना रोजगार निर्मितीसाठी आ.रोहित दादा यांना मिरजगाव जिल्हा परिषद गटातून मोठे मत्ताधिक्य देवून आ.रोहित दादा पवार यांचे हात बळकट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.