२२७ – कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत ४४ अर्जांची विक्री तर १ नामनिर्देशनपत्रे दाखल

Google search engine

 

अहिल्यानगर जिल्ह्यातील २२७ – कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी आज अखेर एकुण ४४ उमेदवारी अर्जांची विक्री विक्री झाली असून एका उमेदवाराने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी दिली.

२२७ – कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी काल दि. २३ ऑक्टोबर रोजी एकुण २३ अर्जांची विक्री तर एक नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. तर आज दि. २४ ऑक्टोबर रोजीपर्यंत एकूण ४४ अर्जांची विक्री विक्री करण्यात आली असून आज अखेर एकच नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे.

कर्जत जामखेड या मतदारसंघाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले असून या मतदारसंघात भाजपचे वतीने आ. राम शिंदे व तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने आ. रोहीत पवार यांच्यात जरी प्रमुख लढत होत असली तरी या निवडणुकीत आम आदमी पार्टी, राष्ट्रीय समाज पार्टी, प्रहार जनशक्ती पक्ष यासह अनेक अपक्ष उमेदवार उमेदवारी करणार असल्याचे दिसून येत आहे. आज पर्यंत अर्ज घेऊन गेलेल्या व्यक्तींमध्ये त्यांची नावे असल्याचे दिसून आले आहे.

गेल्या तीन दिवसांत २४ व्यक्तींनी ४४ उमेदवारी अर्ज नेले आहेत. यामध्ये आमदार प्रा. राम शिंदे, आशाताई राम शिंदे, रोहित पवार, अॅड कैलास शेवाळे, अंबादास पिसाळ, संतोष नवलाखा, विकास राळेभात, हनुमंत पावणे, शंकर शिंदे, रविंद्र कोठारी, भाऊसाहेब सटाले, निखील जगधने, प्रा अशोक पावणे, युवराज हाके, शहाजी उबाळे, दत्तात्रय सोनवणे, स्वप्नील देसाई, अॅड गजेंद्र बागल, सतिश कोकरे, विकास मासाळ, सुहास गंगावणे, तारेक सय्यद, आप्पा पालवे या उमेदवारांनी स्वताः किंवा त्यांच्या प्रतिनिधींमार्फत उमेदवारी अर्ज नेले आहे.

दरम्यान आज दि. २५ रोजी प्रा राम शिंदे हे कुठलेही शक्तिप्रदर्शन न करता, अत्यंत साधेपणाने हा उमेदवारी अर्ज भरणार आहे.

आमदार शिंदे यांना कर्जत-जामखेड मतदारसंघातून भाजपाने सलग चौथ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहे.यंदा होणाऱ्या निवडणूकीसाठी आमदार प्रा राम शिंदे हे आज २५ रोजी दुपारी १२ नंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान सर्व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व नेते यांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर उमेदवार म्हणून आज शुक्रवार दि.२५, ऑक्टोबर २०२४ रोजी १२ वाजेनंतर अतिशय साध्या पद्धतीने, कुठलेही शक्ती प्रदर्शन न करता, सामान्य व्यक्तीच्या व पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते व उपस्थित उमेदवारी अर्ज भरून, आपण ही प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. महायुतीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते या सर्वांनी नोंद घ्यावी व उपस्थित रहावे ही विनंती, असे आमदार शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.